Loading...

गाडी धुतल्यानंतर करा फक्त हे 1 काम, स्कूटर असो किंवा बाइक, येईल नव्या सारखी चमक

जवळपास सर्वच लोकांकडे स्कूटर, बाइक किंवा कारमधून एक वाहन असते. अनेक घरांमध्ये तर हे तिन्हीही उपलब्ध असते.

Divya Marathi Sep 07, 2018, 11:57 IST

ऑटो डेस्क: जवळपास सर्वच लोकांकडे स्कूटर, बाइक किंवा कारमधून एक वाहन असते. अनेक घरांमध्ये तर हे तिन्हीही उपलब्ध असते. याचा सतत वापर केल्याने किंवा घराबाहेर पडून राहिल्यानेही हे खराब होते. धूळीसोबतच यावर चिखल किंवा दूसरे डाग पडत असतात. अनेक वेळा गाडी धुवूनही काही डाग निघत नाहीत. गाडी धुतल्यानंतरही चांगली चमक येत नाही. यासाठीच आम्ही तुम्हाला वाहन धुण्यासंबंधीत काही टिप्स सांगणार आहोत. यामुळे तुमची गाडी एकदम चकाचक आणि नवीन वाटेल. 

 

तुमचे वाहन तुम्ही असे धुता का 
जास्तीत जास्त लोक आपले वाहन धुण्यासाठी शाम्पू किंवा सर्फचा यूज करतात. शाम्पूने गाडी धुतल्यावर गाडीला थोडी थोडी शायनिंग येते. परंतू गाडी सर्फने धुतल्यावर पाणी सुकल्यानंतर गाडीवर व्हाइट निशान दिसतात. मग नंतर गाडीवर ओला कपड्याने हात फिरवावा लागतो. परंतु तरीही गाडीला ती चमक येत नाही. मग तुम्हाला चमक आणण्यासाठी गाडी धुतल्यानंतर शाइन स्प्रे किंवा पॉलिशचा वापर करावा लागेल. 


असा करा शाइन स्प्रेजा वापर 
कार, बाइक किंवा स्कूटर धुण्यापुर्वीही एका कपड्याने हलक्या हातांनी स्वच्छ करा. असे केल्याने त्यावरील धूळ दूर होईल. यानंतरच पाणी टाका. जेव्हा पुर्ण बाईकवर पाणी योग्य प्रकारे पडेल, तेव्हा एका बकेटमध्ये थोडे पाणी टाकून त्यामध्ये शाम्पू मिक्स करुन घ्या. आता हे बाइकवर लावा. यानंतर बाईक स्वच्छ पाण्याने स्वच्छ करा. 


आता कार, बाइक किंवा स्कूटरचे पाणी सुकण्याची वाट पाहा. यानंतर यावर शाइन स्प्रे किंवा पॉलिशचा वापर करा. अशा प्रकारचे स्प्रे 100 रुपयांपासून मिळणे सुरु होते. स्प्रे लावल्यानंतर ते स्वच्छ कोरड्या कपड्याने सगळीकडे पसरवा. तुमची बाइक, कार किंवा स्कूटर चमकू लागेल. एक स्प्रे तुम्ही 10 वेळा यूज करु शकता. 

 


Loading...

Recommended


Loading...