Loading...

Video: मद्यधुंद अवस्थेत सापाला मांडीवर बसवले, फना पकडला; मग घडले असे काही...

गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातून आलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Divya Marathi Aug 11, 2018, 14:31 IST

अहमदाबाद - गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातून आलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक कोब्राला मांडीवर घेऊन बसला. एवढेच नव्हे, तर वारंवार त्याचा फना पकडून खेळत होता. या दरम्यान सापाने त्याच्या हाताचा 3-4 वेळा चावा घेतला. त्याला रस्तयावरून जाणाऱ्या आणि व्हिडिओ बनवणाऱ्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची परिस्थिती अजुनही चिंताजनक आहे. 


रस्त्यावर फिरतानाच पकडला कोब्रा
नवसारी जिल्ह्यात एका रस्त्यावरून जाताना मद्यधुंद असलेल्या व्यक्तीला किंग कोब्रा साप दिसून आला. त्याने वेळीच सापाची शेपूट धरली आणि ओढून रस्त्यावर आणले. यानंतर स्वतः मांडी घालून बसला आणि सापाला अगदी लहान लेकरुप्रमाणे आपल्या मांडीवर बसवले. साप या वर्तनावर चिडलेला होता. त्याने आपला फना काढून वारंवार त्या व्यक्तीला दूर राहण्याचा इशारा दिला. तरीही तो मद्यपी वारंवार त्या सापाचा फना पकडण्याचा प्रयत्न करत होता. सापाचा फना पकडताच सापाने त्याच्या हाताचा चावा घेतला. तरीही तो थांबला नाही. वारंवार पकडण्याचा प्रयत्न करत असताना साप त्याला चावत होता. त्याचवेळी अचानक सापाने त्या मद्यपी माणसाचे बोट धरले. काही सेकंदानंतर त्याने सापाला सोडून दिले आणि तेथेच पडला. त्या रस्त्यावरून जाणाऱ्या काही युवकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.


Loading...

Recommended


Loading...