Loading...

​ अतिशय कमजोर झाले आहेत धर्मेंद्र, ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर एका फॅनने केली कारपर्यंत जाण्यास त्यांची मदत

82 वर्षीय धर्मेंद्र यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते ट्राफिकमध्ये अडकलेले दिसत आहेत.

Divya Marathi Sep 12, 2018, 14:07 IST
एंटरटेन्मेंट डेस्कः 82 वर्षीय धर्मेंद्र यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत धर्मेंद्र ट्राफिकमध्ये अडकलेले दिसत आहेत. त्यांना ट्राफिकमधून वाट काढत आपल्या कारपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. त्यांना अडचणीत बघून एक चाहता त्यांच्या मदतीला धावून आला. या तरुणाने धर्मेंद्र यांना ट्राफिकमधून वाट काढत त्यांच्या कारपर्यंत पोहोचवले. रस्त्यावर धर्मेंद्र यांना बघून त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांची गर्दी जमू लागली होती. या व्हिडिओत धर्मेंद्र अतिशय कमजोर झालेले दिसत आहेत. त्यांचा अलीकडेच 'यमला पगला दीवाना फिर से' हा चित्रपट रिलीज झाला होता. यामध्ये ते त्यांची मुले सनी आणि बॉबी देओलसोबत झळकले होते. पण त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. धर्मेंद्र आता त्यांचा जास्तीत जास्त वेळ फार्म हाऊसवर घालवत असतात. 


Loading...

Recommended


Loading...