Loading...

लघुउद्योगांना चालना देण्यासाठी देअॅझल व आऊटगो एकत्र; बिलिंग, अपॉइंटमेंट, सदस्‍यता व्‍यवस्‍थापन करणे अधिक सोयीचे

देअॅझल सर्व्हिसेसनेव्यवहार अधिक कॅशलेस आणि पेपरलेस करण्याच्या उद्देशाने आऊटगो कंपनी अक्वायर केली आहे.

Divya Marathi Aug 14, 2018, 22:13 IST

> देअॅझलच्या अॅप व वेबसाईटच्या माध्यमातून कॅशलेस आणि पेपरलेस व्यवहार शक्य.
> छोटे व्यावसायिक आपल्या व्यवसायाची नोंदणी करून अनेक ग्राहकांपर्यंत पोहचू शकतात.
> ग्राहकांना एकाच अॅपवर पुणे शहरतील अनेक सेवांचा लाभ घेता येईल.


खास लघु व्यावसायिकांसाठी / सेवांसाठी वापरले जाणाऱ्या देअॅझल सर्व्हिसेसने, डिजिटल इंडियाला पाठींबा देण्यासाठी व व्यवहार अधिक कॅशलेस आणि पेपरलेस करण्याच्या उद्देशाने आऊटगो ही कंपनी अक्वायर केली आहे.


देअॅझलच्या अॅप व वेबसाईटच्या माध्यमातून छोटे व्यावसायिक आपल्या व्यवसायाची नोंदणी करून अनेक ग्राहकांपर्यंत पोहचू शकतात व आपला व्यवसायातील व्यवहार हा सोपा करू शकतात. देअॅझल ची सुरुवात पर्सिस्टन्ट सिस्टिम्स चे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी केली आहे. या वेळी ते म्हणाले की, “आऊटगो बरोबर एकत्र येऊन, देअॅझल मधील बिलिंग पेमेंटला विस्तारित आणि सशक्तता लाभेल. तसेच स्थानिक व्यवसायांना ईकॉमर्स च्या सहाह्याने मदत मिळेल. तसेच व्यवसायामधील बिलिंग, अपॉइंटमेंट व सदस्यता व्यवस्थापन करणे सोईचे होईल.”


या वेळी आऊटगोच्या संस्थापिका, चेतना पवार म्हणाल्या की, “छोटे व्यावसायिक दररोजचा जास्त वेळ हा बिलिंग, चलन तपासणी, खर्च तपासणी या मध्येच घालवतात. यासाठी आम्ही व्यावसायिकांचा दररोजचा व्यवहार हा जलद व माफक दरात कसा होईल यावर उपाय शोधत आहोत. आम्ही आऊटगोची स्थापना नोटा बंदीच्या वेळी केली असून आता पर्यंत अनेक व्यावसायिक आमच्याशी जोडले आहेत. आता देअॅझल बरोबर एकत्र येऊन व्यावसायिकांना परिपूर्ण उपाय व अनेक नव्या सुविधा आम्ही घेऊन येत आहोत.”  

 

देअॅझल अॅप व वेबसाईट वर छोटे व्यावसायिक आपल्या व्यवसायाची नोंदणी करून अनेक ग्राहकांपर्यंत पोहचू शकतात. या अॅप वरून नवीन ओर्डर मिळणे, त्याचे ऑनलाइन पेमेंट घेणे, तसेच ग्राहकांच्या कायम संपर्कात राहणे अशा सेवांचा उपभोग घेऊन छोटे व्यावसायिक आपला व्यवसाय वाढवू शकतात व तो नियंत्रणात ठेवू शकतात.


त्याच प्रमाणे पुण्यातील ग्राहकांसाठी सुद्धा हे अॅप अतिशय फायदेशीर आहे. या एकाच अॅपच्या माध्यमातून अनेक सेवांचा लाभ घेता येतो. या मध्ये ऑटोमोबाईल दुरुस्ती, सलून, स्पा, तसेच घरगुती सोई मध्ये वृतपत्र, दुध, भाज्या इ. गोष्टी घरपोच देणे, अशा अनेक सेवांचा लाभ या अॅपच्या माध्यमातून घेता येतो. त्याच प्रमाणे देअॅझल आपल्याला नियमित सेवांसाठी कॉम्बो ऑफर सुद्धा ग्राहकांना देत आहे. तसेच आऊटगो व देअॅझल एकत्र आल्यामुळे पाळणाघर, बालवाडी, कोचिंग क्लासेस, दागिने इ. सेवांचा देखील भर पडला आहे.


देअॅझल च्या माध्यामतून छोटे व्यावसाय / सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे व  यांच्या माध्यमातून महिन्याला १ लाख व्यवहार व्हावा असा हेतू आहे.


Media Contact: Aspire PR & Strategies Pvt. Ltd, Shekhar Wagh 9967348414

 


Loading...

Recommended


Loading...