Loading...

8-10 वर्षाच्‍या मुलांचा मुंबईच्‍या लोकलमध्‍ये धोकादायक स्‍टंट, घटना कॅमे-यात कैद

मुंबईच्‍या लोकल ट्रेनमध्‍ये दरवाजाला पकडून धोकादायकरित्‍या स्‍टंट करतानाचा 8 ते 10 वर्षे वयाच्‍या मुलांचा व्हिडिओ व्‍हाय

Divya Marathi Sep 05, 2018, 20:21 IST

मुंबई- मुंबईच्‍या लोकल ट्रेनमध्‍ये दरवाजाला पकडून धोकादायकरित्‍या स्‍टंट करतानाचा 8 ते 10 वर्षे वयाच्‍या मुलांचा व्हिडिओ व्‍हायरल झाला आहे. यात 4 ते 5 मुल स्‍टंट करताना दिसत आहे. रविवारी मस्जिद बंदर आणि सँडहर्स्‍ट रोड रेल्‍वे स्‍टेशनदरम्‍यानचा हा व्हिडिओ असल्‍याचे सांगितले जात आहे. 


- मुल मस्जिद बंदर रेल्‍वे स्‍टेशनवर ट्रेनमध्‍ये चढले होते. डब्‍बा त्‍यावेळी रिकामा होता. यापूर्वी एक मुलगी ट्रेनच्‍या दरवाजामधील रॉडला पकडून स्‍टंट करताना व्हिडिओमध्‍ये कॅप्‍चर झाली होती. 31 ऑगस्‍टच्‍या रात्री हा व्हिडिओ बनविण्‍यात आला होता. ही मुलगी हार्बर मार्गावर रे-रोडपासून फर्स्‍ट क्‍लासच्‍या डब्‍ब्‍यामध्‍ये बसली होती. 
- पोलिसांचे अलर्ट आणि कठोर कारवायानंतरही मुंबईत धावत्‍या ट्रेनमध्‍ये स्‍टंट वाढत आहे. जीआरपी अनूसार, दरवर्षी अशा स्‍टंटमुळे 3000 हून अधिक जणांचा मृत्‍यू होतो. म्‍हणजेच दरदिवशी 8 लोक यामुळे आपला जीव गमावतात.  

 


Loading...

Recommended


Loading...