Loading...

दहीहंडी उत्‍सवात नियमांचे उल्‍लंघन, अभिनेता संतोष जुवेकरवर पुण्‍यात गुन्‍हा दाखल

सहकारनगर परिसरातील अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाने ध्वनी प्रदूषण व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष

Divya Marathi Sep 06, 2018, 07:58 IST

पुणे- सहकारनगर परिसरातील अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाने ध्वनी प्रदूषण व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष, स्टेजमालक, साउंडमालक यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला अाहे. अभिनेता संताेष जुवेकर हा या दहीहंडी उत्सवासाठी येथे अाला नसतानाही त्याच्यावर सदर भागात असलेल्या पाेस्टरवरून पाेलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस अाला.

 
मागील महिनाभरापासून अापण मुंबईतच असून पाेलिसांनी काेणत्या अाधारे गुन्हा दाखल केला याची माहिती नसल्याचे जुवेकरने सांगितले. अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळाचे अध्यक्ष, स्टेजमालक, साउंडमालकाने सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना स्टेजची राेडवर बांधणी केली. त्यावर प्रमाणापेक्षा जास्त अावाजात गाणी वाजवून जाणीवपूर्वक ध्वनी प्रदूषण केले. तसेच बेकायदेशीरपणे लाेकांचा जनसमुदाय जमवून सार्वजनिक रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण केला अाणि कार्यक्रम ठरावीक मुदतीनंतर बंद करण्यास सांगितला असता मंडळाच्या अध्यक्षांनी कार्यक्रम बंद करण्यास विराेध करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला अाहे. 

 


Loading...

Recommended


Loading...