स्पोर्ट्स डेस्क - 18 व्या Asian Games मध्ये भारतीय खेळाडू एकाहून एक कामगिरी करत आहेत. एकीकडे भारतीय क्रिकेट टीम निराशाजनक कामगिरी करत असताना दुसरीकडे आशियाई खेळांत अनेक खेळाडू दैदिप्यमान कामगिरी करताना दिसून येत आहेत. दिनेश कार्तिकची पत्नी दीपिका पल्लीकर हे त्याचे उत्कृष्ठ उदाहरण आहे. क्रिकेटमध्ये दिनेशचे भवितव्य धोक्यात असताना त्याची पत्नी दीपिका पल्लीकर स्कॉशमध्ये एकामागोमाग एक पदके मिळवत सुरेख कामगिरी करत आहे. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी दिनेश फार मेहनत घेत आहे. तरीही त्याला साजेशी कामगिरी करता न आल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीतून वगळण्यात आले. दीपिकाची आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरी कौतुकास्पद आहे. स्कॉशमध्ये तिने एकेरी प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. तर सांघिक प्रकारात दीपिकाने रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत त्यांचा सामना काही दमदार नव्हता त्यामुळे त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या कपलचे आणखी काही फोटो...