Loading...

कोरेगाव भीमाप्रकरणी समितीची स्थापना नाही; अहवालांच्या चर्चेवर गृह विभागाचे स्पष्टीकरण

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात राज्य शासनाने विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची कोणतीही समिती स्थापन केली ना

Divya Marathi Sep 12, 2018, 07:20 IST

मुंबई- कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात राज्य शासनाने विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची कोणतीही समिती स्थापन केली नाही. त्यामुळे यासंबंधीचा अहवाल राज्य सरकारकडे येण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण गृह विभागाने दिले आहे. विविध माध्यमांत यासंदर्भात प्रसारित होणारी बातमी दिशाभूल करणारी असल्याचेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे. 


कोरेगाव भीमाप्रकरणी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली समन्वय समिती स्थापन करून त्यांनी अहवाल दिल्याची बातम्या विविध वृत्तवाहिन्यांवर आणि सोशल मीडियावर प्रसारित केल्या जात आहेत. त्यावर गृह विभागाने स्पष्ट केले आहे की, अशी कोणतीही समन्वय समिती स्थापन करण्यात आली नसून राज्य सरकारकडे यासंबंधी कोणताही अहवाल आला नाही. यापूर्वीच राज्य सरकारने या दंगलीप्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचा चाैकशी अायाेग नेमला आहे. 

 

९ जानेवारी रोजी पुणेे जिल्ह्यातील सर्व दलित संघटनांच्या प्रमुख नेत्यांची बैठक विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. या बैठकीत पोलिसांना सहकार्य होण्यासाठी व समाजात शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने उपस्थित नेत्यांपैकी प्रमुख १० नेत्यांची समन्वय समिती नेमण्यात आली होती. मात्र, या प्रकरणी विशेष पोलिस महानिरीक्षक अथवा पोलिस अधीक्षक यांनी कोणतीही सत्यशोधन समिती स्थापन केलेली नाही.


Loading...

Recommended


Loading...