Loading...

चाणक्य नीतीच्या तिसऱ्या अध्यायात पाप आणि गरिबी दूर करण्याचा उपाय सांगण्यात आला आहे

आचार्य चाणक्यांनी आपल्या नीती ग्रंथाच्या तिसऱ्या अध्यायातील अकराव्या श्लोकामध्ये पाप, गरिबी, क्लेश आणि भय दूर करण्याचा उ

Divya Marathi Aug 29, 2018, 10:17 IST

आचार्य चाणक्यांनी आपल्या नीती ग्रंथाच्या तिसऱ्या अध्यायातील अकराव्या श्लोकामध्ये पाप, गरिबी, क्लेश आणि भय दूर करण्याचा उपाय सांगितला आहे. यानुसार, मौन राहिल्याने कलह समाप्त होतो. म्हणजेच कोणी तुम्हाला काही बोलले तर गप्प राहून ऐकून घेणे आणि त्यानुसार काम करत राहणे. गप्प राहिल्याने क्लेश होणार नाही आणि लोकांना तुमच्या मनात काय चाली आहे, हेसुद्धा समजणार नाही. यासोबतच चाणक्यांनी सांगितले आहे की, सदैव सजग राहिल्याने भय दूर होते म्हणजेच नेहमी तत्पर आणि सावध राहिल्यास कोणत्याही प्रकराची भीती राहत नाही.
 

चाणक्य नीतीचा श्लोक - 
उद्योगे नास्ति दारिद्रयं जपतो नास्ति पातकम्। 
मौनेन कलहो नास्ति जागृतस्य च न भयम्॥

 

गरिबी आणि पाप नष्ट करण्याचा उपाय
आचार्य चाणक्य यांच्यानुसार उपाय केल्यास गरिबी राहत नाही म्हणजेच नेहमी योग्य दिशेने प्रयत्न करत राहिल्यास विद्या आणि सुख मिळते. विद्येने धन मिळते. यामुळे गरिबी दूर होते. यासोबत आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, निरंतर मंत्र जप किंवा पूजा करत राहिल्याने बुद्धी आणि मन निर्मळ होते. यामुळे प्रायश्चित होते आणि सर्वप्रकाराचे पापही नष्ट होते.


Loading...

Recommended


Loading...