Loading...

पुण्यात अलिशान 'जग्वार' कारच्या खरेदीनिमित्त वाटले सुवर्णवर्खीचे पेढे, एक पेढा 'फक्त' २४० रुपयांना

घरी नवीन वस्तूची खरेदी झाली, की तो आनंद मिठाई वाटून साजरा केला जाणे, हे स्वाभाविक आहे.

Divya Marathi Sep 05, 2018, 08:09 IST

पुणे- घरी नवीन वस्तूची खरेदी झाली, की तो आनंद मिठाई वाटून साजरा केला जाणे, हे स्वाभाविक आहे. पण क्वचित कधीतरी त्या मिठाईलाही वेगळेच 'मूल्य' प्राप्त होते, याचा प्रत्यय पुण्यातील धायरी परिसरातील (सिंहगड रस्ता) अनेक नागरिकांनी मंगळवारी घेतला आणि चक्क सोन्याचे पेढे खाण्याचा आनंद मिळवला. 


धायरी परिसरात सुरेश पोकळे हे नाव सुपरिचित आहे. वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय, पण एकेकाळी अतिशय हलाखी सोसलेले पोकळे कुटुंब आज या संपूर्ण परिसरात बडी अासामी म्हणून प्रसिद्ध आहे. नुकतीच पोकळे कुटुंबीयांनी जग्वार एक्स एफ ही सुमारे ६० लाख रुपये किमतीची आलिशान गाडी खरेदी केली. इतकी मौल्यवान खरेदी झाल्यावरचा आनंदही तशाच मौल्यवान पद्धतीने साजरा करायला हवा, या भावनेने पोकळे कुटुंबीयांनी चक्क आपल्या इष्टमित्रांना सोन्याचे पेढे खाऊ घालण्याचा निर्णय घेतला आणि ही सुवर्णपेढ्यांची ऑर्डर काका हलवाई मिठाईवाल्यांकडे नोंदवली. दरम्यान, पाेकळे यांनी एकुण किती पेढे वाटले याची माहिती मात्र जाहीर करण्यात अाली नाही. 


काका हलवाई यांनीही प्रथमच बनवले साेनेरी पेढे 
'काका हलवाई'चे अविनाश गाढवे म्हणाले,'पोकळे कुटुंबीयांकडून विचारणा झाल्यावर आम्ही सुवर्णवर्खी पेढे बनविण्याचा निर्णय घेतला. एक किलो पेढ्यांसाठी (सुमारे ३० पेढे) सात हजार रुपये खर्च येईल, असे पोकळे यांना सांगितले. 'आजवर कुणी खाल्ला नसेल असा पेढा बनवा' ही पोकळे कुटुंबीयांची इच्छा प्रमाण मानून ड्रायफ्रूट्सने खचाखच भरलेला, सुवर्णवर्खाचा पेढा आम्ही बनवला. मिठाईचा व्यवसाय असूनही सुवर्णवर्खाचे असे पेढे आम्ही प्रथमच तयार केले. जे द्यायचे ते उत्तम दर्जाचे, या पद्धतीने ते काम करतात. त्यामुळे आलिशान वाहन खरेदीचा आनंद त्याच पद्धतीने साजरा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आम्ही प्रथमच ड्रायफ्रूट्स, केशर, मलईचे सुवर्णवर्खी पेढे बनविले.' 


Loading...

Recommended


Loading...