Loading...

Earthquake : 5.4 तीव्रतेच्या धक्क्याने हादरले पूर्ण नॉर्थ-ईस्ट, बिहार- बंगालमध्येही धरणीकंप

बिहार, पश्चिम बंगालसहित देशाच्या पूर्वोत्तर भागात बुधवारी सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत.

Divya Marathi Sep 12, 2018, 11:32 IST

नवी दिल्ली - बिहार, पश्चिम बंगालसहित देशाच्या पूर्वोत्तर भागात बुधवारी सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. बिहारच्या किशनगंज, पूर्णिया आणि कटिहार परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.4 सांगितली जात आहे. तथापि, बुधवारी सकाळीच हरियाणाच्या झज्जरमध्येही भूकंप झाला होता.

 

Earthquake measuring 5.5 on the Richter scale hits parts of Assam. Tremors also felt in parts of West Bengal; visuals from Siliguri. pic.twitter.com/pixNPJ85or

— ANI (@ANI) September 12, 2018

 

भूकंपाचे केंद्र बांग्लादेशात

या भूकंपाचे केंद्र शेजारी देश बांगलादेशचे रंगपूर होते. भूकंप बिहार, पश्चिम बंगाल, सिक्किम, अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये जाणवला. भूकंप आल्यानंतर अनेक भागांत खळबळ उडाली. लोकं आपापल्या घरांबाहेर सुरक्षित स्थळी आले. तथापि, काही दिवसांपूर्वीच दिल्ली-एनसीआरमध्येही भूकंपाचे झटके जाणवले होते.

 

भूकंपामुळे हादरले हे परिसर
पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड आणि सिक्किम.

 

बिहारच्या या शहरांमध्ये जाणवला भूकंप-
बिहारच्या किशनगंज, पूर्णिया आणि कटिहारमध्ये भूकंपाचे झटके जाणवले आहेत. याशिवाय कूचबिहार, दार्जिलिंग, जलपाईगुड़ीमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या भूकंपानंतर आसामातील काही Photos...

 

 


Loading...

Recommended


Loading...