Loading...

बैल धुण्यासाठी गेलेला मुलगा पाटात वाहून गेला; येवला तालुक्यातील पाटोदा येथील घटना

पाटोदा येथे बैल धुण्यासाठी गेलेला मुलगा पाटात वाहून गेला असून शोधकार्य सुरू आहे. आडगाव रस्त्यावर आण्णासाहेब तनपुरे यांची

Divya Marathi Sep 10, 2018, 11:29 IST

येवला- पाटोदा येथे बैल धुण्यासाठी गेलेला मुलगा पाटात वाहून गेला असून शोधकार्य सुरू आहे. आडगाव रस्त्यावर आण्णासाहेब तनपुरे यांची वस्ती असून शेजारीच पालखेड कालवा आहे. सध्या कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी सुरू असून रविवारी पोळा असल्याने दुपारी बाराच्या सुमारास बैलांना घेऊन गोकुळ आण्णासाहेब तनपुरे (वय १५) हा पाटाच्या कडेला बैल धूत होता. मात्र, अचानकपणे एका बैलाने गोकुळला पाटाच्या पाण्यात ओढले. पोहता येत नसल्याने गोकुळ पाण्यात वाहून गेला. 


सोबत लहान मुले असल्याने त्यांनी हा प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर गोकुळचा शोध सुरू झाला. मात्र, साडेतीन तास उलटूनही गोकुळबाबत कोणताही तपास लागू शकलेला नाही. पाटात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने शोध कार्यात अडथळे येत होते. मात्र, आता पाटाचे पाणी इतरत्र वळवण्यात आले असून शोधकार्य सुरू आहे. गोकुळ हा पाटोदा येथील जनता विद्यालयात दहावीच्या वर्गात आहे. हुशार विद्यार्थी म्हणून त्याची गणना होते. येवला तालुका पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे या घटनेची नोंद झाली नसल्याची माहिती देण्यात आली. 

 


Loading...

Recommended


Loading...