Loading...

Blast Proof: या गॅसच्या टाकीचा होणार नाही स्फोट, बाहेरून दिसेल आत किती; कनेक्शनसाठी नोंदणी सुरू

एका खासगी कंपनीने बनवलेल्या या गॅसच्या कनेक्शनची बुकिंग सध्या सुरू आहे.

Divya Marathi Sep 12, 2018, 00:17 IST

युटीलिटी डेस्क - आता गॅसची टाकी भरण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. सोबतच टाकीचा स्फोट सुद्धा होणार नाही. मार्केटमध्ये असे एक सिलेंडर आले आहे, जे ब्लास्ट प्रूफ आहे. हे अशा प्रकारे बनवण्यात आले आहे की त्याचा स्फोट होणारच नाही. दुर्दैवाने गॅस लीक झाली किंवा स्फोटची परिस्थिती निर्माण झाली, तर आतील मटेरियल गॅस संपवणार आहे. सोबचत, टाकीमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे सुद्धा त्यावर दिसून येईल. जेणेकरून नवीन गॅस कधी बुक करावा याचे नियोजन लावता येईल. एका खासगी कंपनीने बनवलेल्या या गॅसच्या कनेक्शनची बुकिंग सध्या सुरू आहे. 

 
फायबरने बनवलेली हल्की, पण मजबूत बॉडी
- हे नवीन प्रकारचे सिलेंडर जुन्या टाक्यांच्या तुलनेत वजनाने खूप हलके आहे. मध्य प्रदेश राजस्थान, छत्तिसगडसह अनेक राज्यांमध्ये go gas नावाची प्रायव्हेट कंपनी यासाठी कनेक्शन देत आहे. कंपनीचे मध्य प्रदेश स्टेट हेड अजय चंद्रायन यांनी सांगितल्याप्रमाणे, ही टाकी ज्या मटेरियलमने बनवण्यात आली आहे ते ब्लास्ट प्रूफ आहे. परंतु, या टाकी आणि गॅसचे कनेक्शन घेणाऱ्या सरकारी सबसिडीचा लाभ घेता येणार नाही. 
- अर्थातच आपल्याला मार्केट रेटनुसार, सिलेंडरमध्ये गॅस भरण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीने डीलरशिपची योजना सुद्धा सुरू केली आहे. हे सर्व सिलेंडर 2, 5, 10 आणि 20 किलोमध्ये उपलब्ध आहेत. काँफिडेंस ग्रुप गो गॅस नावाने लोकांना ही सेवा उपलब्ध करून देत आहे. लवकरच इतर गॅस कंपन्याप्रमाणे ही कंपनी सुरू करण्याची योजना आहे. 

 
किती रुपये लागतील..?
कंपनीने मध्य प्रदेशात आता कमर्शियल सिलेंडर देण्यास सुरुवात केली आहे. 20 किलोची टाकी 1450 ते 1500 रुपयांत विकली जात आहे. मार्केट रेटनुसार, त्याचे भाव सुद्धा दरमहा बदलतील. लवकरच घरगुती गॅस सिलेंडर सुद्धा विकले जातील. यात 10 किलोच्या टाक्यांचे कनेक्शन जोडण्यासाठी ग्राहकांना 3500 ते 4000 रुपये भरावे लागतील. यात ग्राहकाला सिलेंडर, गॅस, रेगुलेटर दिला जाणार आहे. यानंतर फक्त सिलेंडर भरण्याचे पैसे अदा करावे लागणार आहेत. गॅस कनेक्शन घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र अशी कागदपत्रे लागणार आहेत. बुकिंगच्या वेळी ग्राहकांना एक माहिती पुस्तिका सुद्धा दिली जाणार आहे. 


Loading...

Recommended


Loading...