Loading...

15 ते 31 ऑगस्टदरम्यान भाजप साजरा करणार 'सामाजिक न्याय पंधरवाडा', सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचवणार

संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर अनंत कुमार यांनी ही माहिती दिली.

Divya Marathi Aug 07, 2018, 12:25 IST

नवी दिल्ली - 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्टदरम्यान भाजपच्या वतीने देशभरात 'सामाजिक न्याय पंधरवाडा' साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत निर्णय घेतला असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी दिली. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर अनंत कुमार यांनी ही माहिती दिली. 


जनतेपर्यंत पोहोचवणार सरकारचे काम 
'सामाजिक न्याय पंधरवाडा' अंतर्गत मोदी सरकारचे मंत्री आणि भाजप नेते 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्टदरम्यान देशभरातील विविध भागांमध्ये भेटी देणार आहेत. सरकारने सामाजिक न्याय आणि सुरक्षेसाठी कोणते निर्णय घेतले याबाबत लोकांना माहिती दिली जाणार आहे. तसेच पुढील वर्षापासून मोदी सरकार 1 ते 9 ऑगस्टदरम्यान सामाजिक न्याय आठवडा साजरा करणार असल्याचेही अनंत कुमार यांनी सांगितले. 


Loading...

Recommended


Loading...