Loading...

BIGG BOSS: कॉमेडियन भारती सिंहला पती हर्षपेक्षा मिळणार आहे दुप्पट फीस, आकडा ऐकून व्हाल अचंबित!

कॉमेडियन भारती सिंह तिचा पती हर्ष लिम्बाचियासोबत बिग बॉस 12 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होत आहे.

Divya Marathi Sep 06, 2018, 11:18 IST

एंटरटेन्मेंट डेस्कः कॉमेडियन भारती सिंह तिचा पती हर्ष लिम्बाचियासोबत बिग बॉस 12 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होत आहे. ही या पर्वाची पहिली सेलिब्रिटी जोडी आहे. याचा खुलासा मंगळवारी सलमान खानने गोव्यात झालेल्या बिग बॉस 12 च्या लाँचिंग इव्हेंटमध्ये केला.  वेबसाइट बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी या दोघांना दर आठवड्याला तब्बल 45 लाख रुपये मिळणार आहेत. 


पैशांसाठी बिग बॉसच्या घरात येणार आहे भारती...  

- बिग बॉस 12मध्ये सहभागी होण्याविषयी भारती सिंह म्हणाली, 'हर्ष बिग बॉसच्या घरातून लवकर बाहेर झाला तरी काही हरकत नाही. कारण त्याच्याकडे बाहेर भरपूर काम आहे. पण मला हा शो जिंकायचा आहे.' 

 

- भारतीला या शोसाठी दर आठवड्याला 30 लाख रुपये तर हर्षला 15 लाख रुपये मानधन दिले जाणार आहे. 

 

- चर्चा आहे की, या शोमध्ये सर्वात महागडी जोडी ही ब्रिटिश पोर्न स्टार डैनी डी आणि त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा असेल. बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी हे दोघे सर्वाधिक मानधन घेत आहेत. या जोडीने दर आठवड्यासाठी 95 लाख रुपयांची डिमांड केली आहे.

 

अनेक रिअॅलिटी शोजमध्ये झळकली आहे भारती...

भारती सिंह टीव्ही जगतातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहरा आहे. ती अनेक रिअॅलिटी शोजमध्ये सहभागी झाली आहे. बातम्यांनुसार, भारती-हर्ष ला नच बलिए-8 मध्ये सहभागी होण्यासाठी दर आठवड्याला 30 लाख रुपये मिळाले होते. दोघांनी या शोमध्ये दमदार सादरीकरण केले होते. ती खतरों के खिलाडीचीही स्पर्धक होती.  

 

- 16 सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या बिग बॉस हा शो सोमवार ते शुक्रवार रात्री 10.30 वाजता प्रसारित होणार आहे. तर विकेण्ड स्पेशल शोजमध्ये सलमान खान झळकणार आहे. 

 

जोडी स्पेशल सीझन
बिग बॉसचा हा सीझन जोडी स्पेशल आहे. यंदा 3 सेलेब जोडी आणि 3 कॉमनर्स जोडी शोमध्ये सहभागी होत आहे. इतर 9 स्पर्धक एकटे शोमध्ये सहभागी होतील. 

 

- यावेळी शोचा होस्ट सलमान टीव्हीवरुन घरातील सदस्यांशी संवाद साधणार नाहीये. तर आता घरातील सदस्यांना क्लास रुमसारख्या एका लोकेशनवर बसवले जाणार आणि समोर एक ब्लॅकबोर्डसारखी स्क्रिन असेल. त्यावर सलमान दिसणार आहे. या स्क्रिनवर सलमान टीजरच्या अंदाजात दिसणार असून तो घरातील सदस्यांनचा आठवड्याभराचा लेखाजोखा घेणार.   


Loading...

Recommended


Loading...