Loading...

फक्त 1000 रुपये खर्च करुन आपली जुनी कार करा पेंट, 30 हजारांची होईल बचत

कार किंवा बाइकचा रंग फिकट होतो किंवा स्क्रॅच लागतात, तेव्हा वाहन जुने दिसते. मार्केटमध्ये जाऊन यावर जर कलर करायचा असेल त

Divya Marathi Sep 05, 2018, 11:00 IST

ऑटो डेस्क: कार किंवा बाइकचा रंग फिकट होतो किंवा स्क्रॅच लागतात, तेव्हा वाहन जुने दिसते. मार्केटमध्ये जाऊन यावर जर कलर करायचा असेल तर हजारो रुपये खर्च होतात. विशेष म्हणजे कारवर नवीन कलर देण्यासाठी 25 ते 30 हजार रुपये येतात. स्प्रे पेंटने हे काम तुम्ही कमी पैसात करु शकता. Banna ब्रांडचा स्प्रे पेंट यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतो. 


कारवर कलरचा खर्च 1000 रुपये 
एका स्प्रे पेंटची ऑनलाइन प्राइस जवळपास 220 रुपये आहे. यामध्ये 440ML कलर असते. कंपनीचा दावा आहे की, कलर हँडी स्प्रे पेंट आहे. 5 स्प्रे पेंटची किंमत जवळपास 1100 रुपये आहे. एवढ्या स्प्रेमध्ये कार पेंट केली जाऊ शकते. तर बाइकला पेंट करण्यासाठी फक्त एक स्प्रे खर्च होईल. 

 

कार किंवा बाइक पेंट करण्याची प्रोसेस 
पेंट करण्यापुर्वी तुम्हाला तुमची बाइक किंवा कारवरील जुने पेंट, गंज दूर करुन गाडी पुर्ण स्वच्छ करावी लागेल. यासाठी तुम्हाला रेगमाल, थिनर आणि कोरड्या कापडाची गरज आहे.
1. सर्वात पहिले कार किंवा बाइकच्या जुन्या पेंटवर रेगमाल घासून गाडी स्वच्छ करा. कुठेही गंज दिसायला नको. 
2. आता हे कापडाने योग्यप्रकारे स्वच्छ करुन घ्या. आता कापडावर थिनर लावून हे स्वच्छ करा. असे केल्याने डस्ट पुर्णपणे स्वच्छ होईल. 
3. गाडी पुर्ण स्वच्छ केल्यानंतर, ज्या ठिकाणी कलर द्यायचा नाही तो एरिया पुर्णपणे कव्हर करा. यासाठी तुम्ही सेलो टेपच्या मदतीने पेपर लावू शकता. 
4. आता स्प्रे पेंट योग्यप्रकारे हलवा. यामध्ये एक बॉल असतो, तो पेंटला योग्य प्रकारे मिक्स करतो. पेंट मिक्स झाल्यानंतर बाइक किंवा कारवर स्प्रे करणे सुरु करा. 
5. पेंट केल्यानंतर हे सुकू द्या. कलर केल्यानंतर तुम्हाला वाटले की, कलर चांगला कलर आलेला नाही, तर तुम्ही दूसरा कोट करु शकता. पेट सुकल्यानंतर कार किंवा बाइक चमकू लागेल. 


Loading...

Recommended


Loading...