Loading...

वाजपेयींच्‍या अस्थिकलशासोबत सेल्‍फी, MIM नगरसेवकाला मारहाण करणारे औरंगाबादचे उपमहापौर तोंडघशी

देशभरात भाजपतर्फे अटलजींना श्रद्धांजली वाहण्‍यासाठी त्‍यांच्‍या अस्‍थींचे \'अस्‍थी कलश रथ\' काढण्‍यात येत आहे.

Divya Marathi Aug 24, 2018, 17:10 IST

औरंगाबाद- अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या श्रद्धांजली प्रस्‍तावास विरोध केल्‍यावरून MIM नगरसेवक सय्यद मतीन यांना अक्षरश: लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करणारे उपमहापौर विजय औताडे हे स्‍वत: अटलजींच्‍या श्रद्धाजंलीबद्दल किती गंभीर आहे, हे उघड झाले आहे. सध्‍या देशभरात भाजपतर्फे अटलजींना श्रद्धांजली वाहण्‍यासाठी त्‍यांच्‍या अस्‍थींचे 'अस्‍थी कलश रथ' काढण्‍यात येत आहे.

 

याच निमित्‍तने शुक्रवारी शहरात अटलजींच्‍या अस्‍थींचा 'अस्‍थी कलश रथ' काढण्‍यात आला होता. मात्र हा रथ म्‍हणजे पिकनिक स्‍पॉट असल्‍याचे कदाचित उपमहापौरांना वाटले. मग काय या रथावर चढत अस्‍थींसोबत अगदी हसतखेळत सेल्‍फी काढण्‍याचा आचरटपणा त्‍यांनी केला.

 

मात्र सेल्‍फी काढतानांचे त्‍यांचे दृश्‍य येथे उपस्थित असलेल्‍या अनेकांनी आपल्‍या मोबाईलमध्‍येही कैद केले. हे फोटो सोशल मीडियावर आता चांगलेच व्‍हायरल होत असून त्‍यांच्‍यावर चहूबाजूकडून टीका होत आहे. कुठे हसावे आणि सेल्‍फी काढावे याचे भानही लोकप्रतिनिधींना असू नये, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्‍यक्‍त होत आहे. तर काहीजणांनी अटलजींच्‍या नावावर एमआयएम नगरसेवकावर धावून जाणारे हे लोकप्रतिनिधी म्‍हणजे ढोंगी असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले आहे.


MIM नगरसेवकाला केली होती मारहाण
17 ऑगस्‍टला औरंगाबाद महापालिकेत अटलजींच्‍या शोकप्रस्‍तावास विरोध केला म्‍हणून उपमहापौर विजय औताडेंसह 4 नगरसेवकांनी सय्यद मतीन यांना मारहाण केली होती. याप्रकरणी त्‍यांच्‍यावर गुन्‍हाही दाखल करण्‍यात आला आहे.


 

 


Loading...

Recommended


Loading...