Loading...

महादेवाचा प्रिय महिना श्रावण संपत आहे.. त्यापुर्वी करा हे खास उपाय.. बदलेल वाईट काळ

महादेवाचा प्रिय महिना श्रावण आता संपत आहे. 9 सप्टेंबरला पोळ्याच्या दिवशी हा मास समाप्त होईल.

Divya Marathi Sep 08, 2018, 18:10 IST

महादेवाचा प्रिय महिना श्रावण आता संपत आहे. 9 सप्टेंबरला पोळ्याच्या दिवशी हा मास समाप्त होईल. त्यानंतर भाद्रपद महिना सुरु होईल. त्यापूर्वी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केल्यास दुर्भाग्यातून मुक्ती मिळू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, 11 उपाय. यापैकी कोणताही एक उपाय केल्यास अक्षय पुण्य वाढेल आणि सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात...


1. दूध-जल अर्पण करताना शिवलिंग हातांनी रगडावे. या उपायाने हातावरील दुर्भाग्य वाढवणाऱ्या रेषा मिटू शकतात आणि काळ बदलू शकतो.


2. पाण्यामध्ये केशर मिसळून शिवलिंगावर अर्पण करावे. या उपायाने विवाह आणि वैवाहिक जीवनातील सर्व समस्या नष्ट होऊ शकतात.


3. तांदूळ शिजवून भाताने शिवलिंगाचा शृंगार करावा. त्यानंतर पूजा करावी. यामुळे मंगळाचे दोष शांत होतात.


4. वेळोवेळी महादेवासाठी सव्वा किलो किंवा सव्वा पाच किलो किंवा 11 किलो किंवा 21 किलो गहू दान करावेत.


5. शिवलिंगावर जल अर्पण करताना काळे तीळ पाण्यात मिसळावेत. या उपायाने शनी दोष आणि रोग दूर होतात.


6. तुम्हाला झटपट यश प्राप्त करण्याची इच्छा असल्यास पाऱ्यापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करावी. पारद शिवलिंग अत्यंत चमत्कारी असते.


7. तुम्हाला दीर्घायुष्य हवे असल्यास शिवलिंगावर रोज दुर्वा अर्पण कराव्यात. यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी राहते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चार उपाय...


Loading...

Recommended


Loading...