Loading...

Trainer च्या फीससाठी नव्हते पैसे, यूट्यूबवर व्हिडिओ पाहून शिकला आणि रचला इतिहास

चांगला भाला खरेदी करण्यासाठी जवळपास दीड लाख रुपये लागतात. पण नीरजच्या वडिलांनी सात हजारांत एक स्वस्त भाला खरेदी केला.

Divya Marathi Aug 28, 2018, 10:40 IST
स्पोर्ट्स डेस्क - ज्वेलिन थ्रोअर (भाला फेकपटू) नीरज चोप्राने 18व्या आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाची कमाई करून दिली. त्याने 88.06 मीटर अंतरावर भाला फेकला. हा त्याचा वैयक्तिक आणि राष्ट्रीय विक्रमही ठरला. एशियाडमध्ये भालाफेक क्रीडाप्रकारात सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला भारतीय आहे. त्याच्याआधी 1951 दिल्ली एशियाडमध्ये परसा सिंहने रौप्य आणि 1982 मध्ये भारताच्या गुरतेज सिंहने कांस्य पदकाची कमाई केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार नीरजने या खेळाचे प्राथमिक प्रशिक्षण यूट्यूब व्हिडिओ पाहून घेतले आहे.    कुटुंबाला क्रीडा क्षेत्राची पार्श्वभूमी नाही  नीरज 17 जणांच्या संयुक्त कुटुंबात राहतो. त्याचे वडील शेतकरी आहेत. आठ बहीण भावांमध्ये तो सर्वात मोठा आहे. त्याच्या पूर्वी त्याच्या कुटुंबातील कोणीही क्रीडा क्षेत्रात नाही. स्टारडम मिळाल्यास नीरजच्या कामगिरीवर परिणाम होईल का असे विचारले असता त्याचे काका म्हणाले, आमचा मुलगा खूप साधा आहे. इगो त्याच्या जवळही येणार नाही. त्याचा संबंध फक्त कामाशी असतो. आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत. त्यामुळे मागेल ते लगेचच मिळत नाही. नीरजनेही इथपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे.     भाला खरेदीसाठीही नव्हते पैसे  मीडिया रिपोर्ट्सनुसार नीरजने ज्वेलिन थ्रो शिकण्यासाठी कोणाकडून प्राथमिक प्रशिक्षण घेतले नाही. तर त्याने यूट्यूबवर व्हिडिओ पाहून हा खेळ शिकला. एक काळ असा होता जेव्हा नीरजकडे भाला खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. चांगला भाला खरेदी करण्यासाठी जवळपास दीड लाख रुपये लागतात. पण नीरजच्या वडिलांनी सात हजारांत एक स्वस्त भाला खरेदी केला. त्यानेच नीरज प्रॅक्टीस करायचा.    ऑलिम्पिक पदकाचे लक्ष्य  नीरजच्या कामगिरीमुळे या एशियाड स्पर्धेत 9 व्या वेळी भारतीय राष्ट्रगीत वाजले. आता 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई करण्याचे ध्येय नीरजने समोर ठेवले आहे. नीरजचे काका म्हणाले की, टोकियोमध्ये तो पोडियमवर उभा असावा आणि भारताचे राष्ट्रगीत वाजत असावे अशी त्याची इच्छा आहे. 


Loading...

Recommended


Loading...