Loading...

एशियन गेम्स : भारताच्या रोइंग मेन्स टीमने जिंकले गोल्ड मेडल, इव्हेंटमध्ये दिवसातील तिसरे पदक

बॉक्सिंगमध्ये 60 किलो गटात शिव थापा आणि 69 किलो गटात मनोज कुमार राउंड ऑफ 16 मध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करतील.

Divya Marathi Aug 24, 2018, 12:19 IST

जकार्ता - आशियाई स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताने रोईंगमध्ये तीन पदकांची कमाई केली. पुरुषांच्या टीमने इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल जिंक भारताला रोईंगमध्ये या स्पर्धेतील पहिले गोल्ड मेडल मिळवून दिले. क्वाड्रूपूल स्कल्स स्पर्द्धे भारताच्या सवर्ण सिंह, दत्तू भोकानल, ओमप्रकाश आणि सुखमीत सिंह यांनी 6 मिनिट 17 सेकंदाची वेळ घेत पहिले स्थान मिळवले. त्याआधी पुरुष लाइटवेट सिंगल्समध्ये दुष्यंतने कास्य पदक जिंकले. त्यांनी 7 मिनट 18 सेकंदाच्या वेळेसह पदक निश्चित केले. त्याच्या अगदी नंतर लाइटवेट डबल स्कल्समध्ये रोहित कुमार आणि भगवान सिंहनेही कास्य पदक जिंकले. दोघांनी रेस पूर्ण करण्यासाठी 7 मिनिटे 4 सेकंदाची वेळ घेतली. त्याचबरोबर आशियाई स्पर्धांमध्ये 5 गोल्ड मेडलसह भारताची पदकांची एकूण संख्या 21 वर पोहोचली आहे. 

 

What a great start to the day!
Our men’s #Rowing quadruple sculls team grabbed a GOLD!

With a timing of 6:17.13,it was amazing to see them win.
Congratulations to Sawarn Singh,Dattu Bhokanal,Om Prakash & Sukhmeet Singh.
Great show!Super proud!🥇#AsianGames2018 #KheloIndia🇮🇳 pic.twitter.com/q9Q0UZhb01

— SAIMedia (@Media_SAI) August 24, 2018


दुष्यंतचे आशियाई स्पर्धेती दुसरे कास्य पदक ठरले. त्याने 2014 मध्ये इंचियॉनमध्येही कास्यपदकाची कमाई केली होती. 300 मीटर एअर रायफल शुटिंगमध्ये भारताच्या अमित कुमार आणि हरजिंदर सिंह यांनीही आव्हान कायम ठेवले आहे. तर जलतरणाच्या हीट राऊंडमध्ये सहावे स्थान मिळवत भारताच्या संदीप सेजवालने फायनल राऊंडमध्ये स्थान मिळवले आहे.

 

शुटिंगमध्ये भारताला संधी 

आज एकूण 43 गोल्ड मेडलसाठी स्पर्धा रंगणार आहे. 10 मीटर एअर पिस्तुल शुटिंगमध्ये भारतासाठी आज खास दिवस आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशाच्या दोन पदक विजेत्या हिना सिद्धू आणि मनु भाकर फायनल राऊंडमध्ये पोहोचल्या आहेत. तर आशियाई स्पर्धांमध्ये आजवर फारशी चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलेली अॅथलिट दीपा कर्माकरही बीम बॅलेन्स इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे. तिच्याकडूनही मेडलची अपेक्षा आहे. बॅडमिंटनमध्ये किदांबी श्रीकांत राऊंड ऑफ 32 मध्ये खेळणार आहे. 

 

हॉकीत पुन्हा मोठ्या विजयाची अपेक्षा 

इंडियन हॉकी टीम जपान विरोधात मैदानात उतरेल. भारताने आतापर्यंतचे दोन सामने इंडोनेशिया विरोधात 17-0 आणि हाँगकाँग विरोधात 26-0 ने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांना आणखी एका मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. बॉक्सिंगमध्ये 60 किलो गटात शिव थापा आणि 69 किलो गटात मनोज कुमार राउंड ऑफ 16 मध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करतील. 


Loading...

Recommended


Loading...