Loading...

ऑलिम्पिक चॅम्पियनकडून वर्षभरात दोनदा हरला, त्यालाच नमवून अमितने जिंकले एशियाड सुवर्णपदक

हरियाणाच्या राहणाऱ्या अमितने गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक जिंकले होते.

Divya Marathi Sep 02, 2018, 08:40 IST

- हरियाणाच्या राहणाऱ्या अमितने गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक जिंकले होते. 

- फेब्रुवारी 2018 मध्ये सोफियामध्ये जालेल्या स्ट्रँडझा कपमध्येही गोल्डमेडल जिंकले होते. 


जकार्ता - एशियाडमध्ये शनिवारी बॉक्सिंगच्या 49 किलोगटात अमित पंघालने भारताला गोल्डमेडल मिळवून दिले. ब्रिजमध्ये प्रणब बर्धन (60 वर्षे) आणि शिबनाथ सरकार (56) च्या जोडीने पुरुष पेयर स्पर्धेत गोल्ड मिळवून दिले. भारताच्या यादीत आता 15 सुवर्ण पदकांसह एकूण 67 पदके झाली आहेत. अमित या गटात पदक जिंकणारा भारताचा दुसरा बॉक्सर आहे. त्याच्याआधी बिरजू शाहने 1994 मध्ये या स्पर्धेत या गटात कांस्य पदक जिंकले होते. 


अमितने उझबेकिस्तानच्या दुस्मतोव्ह हसनबॉयला 3-2 ने पराभूत केले. दुस्मतोव्ह 2016 रियो ऑलिम्पिक चॅम्पियन राहिलेला आहे. मेन्स बॉक्सिंगमध्ये भारताला 2010 नंतर प्रथमच सुवर्णपदक मिळाले आहे. 2010 मध्ये विजेंदर सिंहने 75 किलोगटात आणि विकास कृष्णने 60 किलो वजन गटात सुवर्ण पदक मिळवले होते. अमित या एशियाडच्या फायनलपर्यंत पोहोचणारा एकमेव भारतीय बॉक्सर होता. त्याच्या कामगिरीवर केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठौर यांनी ट्वीट करत त्याचे अभिनंदन केले आहे. 

 

स्क्वॅशमध्ये महिला टीमला रौप्य पदक 
भारतीय महिला स्क्वॅश टीमला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मलेशियाने तिला 2-0 ने पराभूत केले. या पराभवानंतर भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारतीय टीममध्ये जोशना चिनप्पा, दीपिक पल्लीकल कार्तिक, सुनैना कुरुविल्ला आणि तन्वी खन्ना यांचा समावेश होता. 

 

पदक तालिका (1-09-2018 दुपारी 03:00 वाजेपर्यंत)

क्र. देश सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 चीन 123 87 63 273
2 जपान 70 52 73 195
3 द.कोरिया 45 54 66 165
4 इंडोनेशिया 31 24 43 98
5 उझबेकिस्तान 20 23 25 58
8 भारत 15 24 29 68

 


Loading...

Recommended


Loading...