Loading...

एशियाड: टेबल टेनिसमध्ये भारतीय महिलांनी कतारचा उडवला धुव्वा, अनू-मुर्मू 400 मीटर हर्डलच्या फायनलमध्ये

टेबल टेनिसच्या महिला वर्गात भारताने कतारचा 3-0 ने धुव्वा उडवला.

Divya Marathi Aug 26, 2018, 10:47 IST
भारताने आतापर्यंत 6 सुवर्ण, 5 रजत आणि 16 कांस्य पदके जिंकली. एशियाडच्या 8व्या दिवशी रविवारी 35 सुवर्ण पदकांवर नजर.
 

जकार्ता - 18व्या आशियाई खेळांच्या 8व्या दिवशी भारताची चांगली सुरुवात झाली. टेबल टेनिसच्या महिला वर्गात भारताने कतारचा 3-0 ने धुव्वा उडवला. भारतीय खेळाडू मौमा दासने कतारच्या महा अलीला 11-3, 11-2 आणि 11-4 ने हरवले. आहिका मुखर्जीने आइआ मोहम्मदला 11-2, 10-12, 11-2, 11-3 आणि सुतिर्था मुखर्जीने महा फरामर्जीला 11-3, 11-3, 11-6 ने धूळ चारली.

 

अॅथलेटिक्सच्या 400 मीटर हर्डलमध्ये भारत फायनलमध्ये पोहोचला आहे. 400 मीटर हर्डल इव्हेंटच्या हीट 2 मध्ये अनु राघवन तिसऱ्या स्थानावर राहिली. दुसरीकडे हीट 1 मध्ये जौना मुर्मू चौथ्या स्थानावर राहिली. दोघीही आता सुवर्ण पदकासाठी कामगिरी करतील. 


Loading...

Recommended


Loading...