Loading...

16 वर्षांच्या सौरभने या एशियाड स्पर्धेत शूटिंगमध्ये मिळवले पहिले GOLD, भारताकडे आतापर्यंत 6 पदके

भारताने 18व्या एशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये तिसऱ्या दिवशी मंगळवारी नेमबाजीत पहिले सुवर्ण पदक जिंकले.

Divya Marathi Aug 21, 2018, 12:03 IST
सौरभने 10 मीटर एअर पिस्टलमध्ये एशियाई खेळांमध्ये रेकॉर्ड बनवला. 16 वर्षीय सौरभने 3 वर्षांपूर्वी नेमबाजीत करिअरला सुरुवात केली.
या वर्षी जर्मनीच्या सुहलमध्ये झालेल्या ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये 3 सुवर्ण पदके जिंकली.

 

जकार्ता -  भारताने 18व्या एशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये तिसऱ्या दिवशी मंगळवारी नेमबाजीत पहिले सुवर्ण पदक जिंकले. भारतासाठी 16 वर्षीय सौरभ चौधरीने 10 मीटर एयर पिस्टलमध्ये सुवर्ण जिंकले. या स्पर्धेचे कांस्य पदक भारताच्याच अभिषेक वर्माने जिंकले. जपानच्या तोमोयुकी मात्सयुदाने रजत पदकावर नाव कोरले. आज भारताला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये दीपा कर्माकर आणि तिरंदाजीत दीपिका कुमारीकडून अपेक्षा आहेत. एशियाडमध्ये भारताच्या एथलीट्सनी आतपर्यंत दो सुवर्ण, दो रजत आणि एक कांस्य जिंकले आहे. सोमवारी महिला रेसलर विनेश फोगाट (50 किग्रा) ने कुस्तीमध्ये गोल्ड जिंकले होते. ती एशियन गेम्समध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली महिला पहिलवान बनली आहे. 23 वर्षीय विनेशने फायनलमध्ये जपानच्या युकी ईरीला 6-2 ने पराभूत केले.

 

भारतासाठी आजच्या इव्हेंट: 
- आर्टिस्टिक जिम्नास्टिक: महिला क्वालिफिकेशन दुपारी 1 वाजेपासून- दीपा कर्माकर, प्रणती दास, अरुणा रेड्डी, मंदिरा चौधरी, प्रणती नायक (फायनल संध्या. 5 पासून)
- ट्रॅप मिक्स्ड टीम क्वालिफिकेशन: लक्ष्य (फायनल दुपारी 3 वाजेपासून)

- रेसलिंग: फ्रीस्टाइल 68 कि.ग्रॅ.- दिव्या, फ्रीस्टाइल 76 किग्रा- किरण, ग्रीकोरोमन 60 किग्रा- ज्ञानेंदर, पुरुष ग्रीकारोमन 67 किग्रा- मनीष (क्वालिफिकेशन दुपारी 12 वाजेपासून. फायनल संध्या. 5.30 वाजेपासून) 
- वेटलिफ्टिंग: फेन्सिंगमध्ये 2-2, वूशुमध्ये 3, तायक्वांडोत 3, माउंटेन बाइकिंगमध्ये 2 गोल्डची अपेक्षा आहे.
- पुरुष रिकर्व्ह इंडिविजुअल: दीपिका कुमारी, अतानु दास, जगदीश चौधरी, सुखचैन, विश्वास (दुपारी 1.20 पासून). यानंतर पुरुष टीमचे सामने.
- महिला हॉकी: भारत विरुद्ध कझाकिस्तान संध्याकाळी 7 वा. 
- महिला कबड्‌डी: भारत विरुद्ध इंडोनेशिया सकाळी 11.20 वाजेपासून.
 

बॅडमिंटनमधून भारताचे आव्हान संपुष्टात:
भारताकडून दोन्ही संघ पदकांच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. भारतीय महिला बॅडमिंटन टीम क्वार्टर फायनलमध्ये जपानकडून 1-3 ने पराभूत होऊन पदकांच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे. दुसरीकडे, पुरुष टीमलाही इंडोनेशियाविरुद्ध 1-3 ने पराभवाचा सामना करावा लागला. फक्त पी.व्ही. सिंधु आणि एचएस प्रणय यांना आपापल्या सिंगल्स सामन्यांत विजय मिळाला.

 

 

पदक तालिका

क्रम देश सुवर्ण रजत कांस्य एकूण
1 चीन 18 13 9 40
2 जपान 8 12 11 31
3 कोरिया 5 10 10 25
4 इंडोनेशिया 4 2 3 9
5 उत्तर कोरिया 4 1 2 7
7 भारत 3 2 1 6

Loading...

Recommended


Loading...