Loading...

अंगणवाडी सेविका, अाशा वर्कर्स‌च्या मानधनात वाढ; पंतप्रधान मोदींची गणेशोत्सवानिमित्त भेट

केंद्र सरकारने आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात केंद्राचा वाटा वाढवला अाहे. आशा कार्यकर्तीचे मानधन दुपट

Divya Marathi Sep 12, 2018, 06:33 IST

नवी दिल्ली- केंद्र सरकारने आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात केंद्राचा वाटा वाढवला अाहे. आशा कार्यकर्तीचे मानधन दुपटीने वाढवण्यात अाले तर अंगणवाडी सेविकांच्या मानधनातही भरघाेस वाढ केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. 


पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी देशातील आशा वर्कर्स‌ अाणि अंगणवाडी सेविकांशी अॅप आणि व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून संवाद साधला. ज्या अंगणवाडी कार्यकर्तीस २२५० रुपये मानधन होते त्यांना आता ३५०० रुपये तर अंगणवाडी सहायक म्हणून काम करणाऱ्यांना १५०० ऐवजी २२५० रुपये मानधन मिळेल. हे नवे मानधन १ ऑक्टोबरपासून लागू केले जाणार आहे. म्हणजेच नोव्हेंबरचे वाढीव मानधन संबंधितांना मिळेल.

 
मोफत विमाछत्र 
मोदी यांनी सांगितले की, आशा कार्यकर्तींंना पंतप्रधान जीवनज्योती विमा आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना मोफत दिली जाणार आहे. म्हणजेच दोन-दोन लाख रुपयांच्या या दोन्ही विमा योजनांसाठी त्यांना हप्ता भरण्याची गरज नाही. हा प्रीमियम सरकार भरेल. 


Loading...

Recommended


Loading...