Loading...

अांदाेलक म्हणाले: अपात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा मिळाला लाभ, अधिकारी म्हणाले : तर कारवाई करू

प्रधानमंत्री अावास याेजनेतून लाभार्थ्यांवर झालेला अन्याय, काेसळलेली अाराेग्य यंत्रणा आणि अपंगांसाठीचा अखर्चित राहिलेल्या

Divya Marathi Sep 06, 2018, 12:38 IST

अकाेला- प्रधानमंत्री अावास याेजनेतून लाभार्थ्यांवर झालेला अन्याय, काेसळलेली अाराेग्य यंत्रणा आणि अपंगांसाठीचा अखर्चित राहिलेल्या निधी, या मुद्द्यांवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या अांदाेलकांनी बुधवारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात धाव घेत अांदाेलन केले. दरम्यान, सीईअाेंच्या कक्षात घुसण्यासाठी अांदाेलक व पोलिसांमध्ये संघर्ष झाला. अपात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे वितरण करण्यात अाले असून, पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात येत असल्याचा अाराेप अांदाेलकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर अधिकाऱ्यांनी याबाबत जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवू आणि वंचित पात्र लाभार्थ्यांसाठी सर्व्हे करु, असे लेखीस्वरुपात अाश्वासन दिले. 


सन २०११मध्ये प्रधानमंत्री अावास याेजनेतून लाभार्थ्यांना घरकुल मिळावे, यासाठी सर्वेक्षण करण्यात अाले. मात्र या याेजनेतून बऱ्याच गावामधील पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात अाली, असा अाराेप प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख तुषार पुंडकर यांनी सीईअाेंना सादर केलेल्या निवेदनात केला. ग्रामपंचायतने सादर केलेल्या ड यादीचे निरीक्षक करून या यादीतील पात्र लाभार्थ्यांना ब यादीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात अाला. यात प्राधान्याने दिव्यांग, विधवा, निराधाराचा समावेश करण्यात, अशीही मागणी करण्यात अाली. अांदाेलनात तुषार पुंडकर, गजानन कुबडे, शाम राऊत, निलेश ठाेकळ, याेगेश पाटील, अतुल काळणे, याेगेश पाटील, बिंटू वाकाेेडे, नितेश मल, निखिल गावंडे, बाॅबी पळसपगार, उमेश पाटील, गाेविंद िगरी, चेतन इंगळे, कुलदीप वसू, सागर उकंडे, सागर पुंडकर, राम कांबे, गाैरव ढाेरे अादींसह माेठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. प्रशासनाकडून उपमुख्य कार्यकारी अधिकारी विकास खिल्लारे यांनी अांदाेलकांशी चर्चा केली. 


काय अाहे प्रशासनाच्या पत्रात 
जिल्हा परिषद सीईअाेंनी अांदाेलकांना मागण्यांबाबत लेखी अाश्वासन दिले. 
१) ग्रामपंचायतनिहाय प्रगणकामार्फत सर्व्हे करून ताे ग्राम सभेकडून मंजूर करण्यात येईल आणि हे प्रस्ताव अॅपवर नाेंद करून तातडीने शासनाला सादर करण्यात येतील. 
२) दिव्यांगाचा ३ टक्के निधी करण्याबाबत १५ दिवसात गट विकास अधिकाऱ्यांनी कार्यवाही न झाल्यास त्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. 
३) अाराेग्य केंद्रांची डिएचअाे पाहणी करून अाढावा घेतील. डाॅक्टर मुख्यालयी राहतात कि नाही, याबाबत खातरजमा करतील आणि सर्व सुविधा उपलब्ध हाेण्यासाठी संबंधितांना सूचना देतील. 


असे घुसले अांदाेलक
अांदाेलकांपूर्वीच सिटी काेतवाली पाेलिस जिल्हा परिषदेत तैनात हाेते. अांदाेलकांना पोलिसांनी सीईअाेंच्या कक्षाकडे जाणाऱ्या लाेखंडी गेटवरच राेखण्याचा प्रयत्न केला. मात्र अांदाेलकांनी पोलिसांना न जुमानता अातमध्ये प्रवेश केला. तसेच सीईअाेंच्या कक्षाबाहेर असलेल्या गेटजवळही पाेलिस व अांदाेलकांमध्ये किरकाेळ वाद झाला. 

 

जि. प. मध्ये असे धरले धारेवर 
१) १० ते १५ एकर बागायती शेत जमीन असलेल्या, दाेन मजली घर असलेल्या ग्रामस्थांना घरकुल याेजनेचा लाभ देण्यात अाला असून, मजुरांना वाऱ्यावर साेडण्यात अाल्याचा अाराेप अांदाेलकांनी केला. यावर काही लाभार्थी वंचित असून, त्यांच्या सर्व्हेक्षणाचा प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. 
२) घरकुल वितरणाबाबत ग्रामसेवक राजकारण करीत असून, एखाद्याने तक्रार केल्यास ग्रामसेवक संबंधित लाभार्थ्यांना सांगतात आणि पुढील लाभ देण्याची जबाबदारी झटकतात ३) अाराेग्य केंद्र, उपकेंद्रात अाैषधींचा तुटवडा असून, डाॅक्टर मुख्यालयी राहत नाहीत. अकाेट उपविभागातील अाराेग्य केंद्र, उपकेंद्रातील इलेक्ट्रिकचे काम अद्याप झालेले नाही. यावर जिल्हा अाराेग्य अधिकारी डाॅ. राठाेड यांनी तातडीने काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली. 

 


Loading...

Recommended


Loading...