Loading...

दाभाेळकरांच्या खुनासाठी अमाेलने अणदुरेला पिस्तूल, दुचाकी पुरवली; सीबीअायचा दावा

कर्नाटकातील पत्रकार गाैरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित अमाेल काळे यानेच नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येसाठ

Divya Marathi Sep 07, 2018, 07:47 IST

पुणे- कर्नाटकातील पत्रकार गाैरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित अमाेल काळे यानेच नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येसाठी अाैरंगाबादचा हल्लेखाेर सचिन अणदुरे यास पुण्यात पिस्तूल अाणि दुचाकी पुरवल्याचा दावा सीबीअायने गुरुवारी पुणे न्यायालयाची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.ए. सय्यद यांनी काळे याला १४ सप्टेंबरपर्यंत सीबीअाय काेठडीत ठेवण्याचे अादेश दिले अाहेत. 


सीबीअायचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी सांगितले की, मुंबर्इ उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी डाॅ. दाभाेलकर प्रकरणाच्या तपासातील अाराेपींविराेधातील मुद्दे न्यायालयात युक्तिवाद न करता लेखी सादर करण्याचे निर्देश दिले अाहेत. न्यायालयीन युक्तिवाद प्रसारमाध्यमात छापून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला अाहे. त्यानुसार सीबीअायच्या वतीने अाराेपीच्या अटकेची कारणे नमूद असलेला रिमांड रिपाेर्ट न्यायालयात सादर करण्यात अाला. तसेच अाराेपीच्या वकिलांना सदर रिपाेर्ट वाचण्यास देऊन प्रसार माध्यमांना माहिती न देण्यास सांगण्यात अाले. संबंधित अहवालात संशयित डाॅ. वीरेंद्रसिंग तावडे यांच्या मदतीने दाभाेलकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा अाराेप अमाेल काळेवर ठेवण्यात अाला. तसेच सचिन अणदुरे यास शस्त्र पुरविणे अाणि दुचाकीची व्यवस्था करुन देणे, तसेच दाभाेलकर यांच्या हत्येसाठी रेकी केल्याचा अाराेप ठेवण्यात अाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


एकाच वेळी वेगवेगळ्या यंत्रणांकडून तपास नकाे 
बचाव पक्षाचे वकील चंडेल म्हणाले, अणदुरे सीबीअाय काेठडीत असताना त्याच्याकडे एसअायटीने पानसरे प्रकरणाची चाैकशी केली. काळे बंगळुरू एसअायटीच्या ताब्यात असताना त्याच्याकडे दाभाेलकर प्रकरणाची सीबीअायने चाैकशी केली. एकावेळी एकाच तपास यंत्रणेने चाैकशी करणे गरजेचे अाहे. मात्र, सीबीअाय वकीलाच्या मते, काळे हा लंकेश हत्या प्रकरणी सूत्रधार असून त्याचा दाभाेलकर प्रकरणात तपास केला जाऊ नये, असा अर्ज बचाव पक्षाने दिलेला नाही. त्यामुळे चाैकशी याेग्यच अाहे. 


केस डायरी तपासावी 
दरम्यान, बचाव पक्षाचे वकील धर्मराज चंडेल म्हणाले, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची प्रत सीबीअायच्या वकिलांनी न्यायालयात सादर केलेली नाही. लेखी स्वरुपात युक्तिवाद सादर करण्यात अाल्याने काेणत्या मुद्द्यावर युक्तिवाद करावयाचा हे कळणे अवघड अाहे. त्यामुळे अाम्हाला रिमांड रिपाेर्ट मिळावा. तसेच सीबीअायने अमाेल काळे याच्यावर शस्त्र पुरवले, दुचाकी पुरविल्याचे सांगितले असले तरी या अाराेपांची केस डायरीतून वैधता तपासण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. 

 


Loading...

Recommended


Loading...