Loading...

बदनामी खटल्यात गैरहजर राहण्याची मुभा द्या : अंजली दमानिया

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या बदनामीप्रकरणी भाजप तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी अंजली दमानिया यांच्याविरुद्ध रावेर

Divya Marathi Sep 07, 2018, 07:24 IST

रावेर (जि. जळगाव)- माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या बदनामीप्रकरणी भाजप तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी अंजली दमानिया यांच्याविरुद्ध रावेर न्यायालयात दावा दाखल केला आहे. या संदर्भात दमानिया गुरुवारी न्यायालयात हजर झाल्या. यापूर्वीच्या सुनावणीला गैरहजर असल्याने त्यांनी वैद्यकीय कागदपत्रे दाखल केली. तसेच लांब अंतरावरून प्रवास करावा लागत असल्यामुळे कायम रजेवर राहण्याची सवलत मिळावी, अशी विनंती करणारा अर्ज देखील केला. त्यावर ५ ऑक्टोबरला सुनावणी होईल. दमानिया म्हणाल्या, खडसे समर्थकांनी आपल्यावर ६ जिल्ह्यांत २७ कोर्टात २८ केसेस दाखल केल्या आहेत. मी मुंबईत राहत असल्याने प्रत्येक कोर्टात हजर राहणे अडचणीचे होते. मला ही केस पूर्ण लढायची आहे. बदनामीप्रकरणी खडसेंनी स्वत: केस केली असती तर ते समजण्यासारखे होते. मात्र, एवढ्या कार्यकर्त्यांकडून दाखल झालेल्या केसेस चुकीच्या आहे. म्हणूूनच सेक्शन २०५ नुसार कायम रजेवर राहण्याची सवलत मिळावी, असा विनंती अर्ज न्यायालयात दिला. तसेच मी खडसे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात ११०० पानांचे क्रिमिनल पीआयएल दाखल केले आहे. त्यात खडसेंच्या सर्व घोटाळ्यांचे पुरावे दिले आहेत. तसेच एसीबीने भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसेंना जी क्लीनचिट दिली आहे, त्या संदर्भात देखील प्रोटेस्ट पीटिशन दाखल केल्याचे दमानिया म्हणाल्या. 


मंदाकिनी खडसे यांच्या खात्यात आले पैसे 
एसीबीने त्यांच्या तपासात एका कंपनीकडून मंदाकिनी खडसे, गिरीश दयाराम चौधरी यांना कर्ज पुरवठा केल्याचे दाखवले आहे. मात्र, ते कर्ज नसून दुसऱ्यांनी दिलेले पैसे खात्यात आले. अब्जायौनी नावाच्या कंपनीने ३ कोटी १९ लाख रुपये बेंचमार्क कंपनीला दिले. त्यातून मंदाकिनी खडसे यांचे खात्यात पैसे आले. अब्जायौनी नावाची कंपनी ही पुजेचे साहित्य विकण्याचे दुकान आहे. हे खडसेंविरोधातील प्रोटेस्ट पिटीशनमध्ये सादर केले आहे. आपण या पिटीशन सुनावणीची वाट पाहत असून त्यात क्लिनचिट प्रकरण खुले होईल, असे अंजली दमानिया यांनी सांगितले. 


Loading...

Recommended


Loading...