Loading...

सलमान खानने शेअर केला भाचीचा इमोशनल फोटो, आजी-आजोबांच्या खुप जवळ आहे एलिजा

सलमान खान सध्या 'बिग बॉस' सीजन 12 आणि आगामी चित्रपट 'भारत'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Divya Marathi Sep 10, 2018, 09:55 IST

मुंबई: सलमान खान सध्या 'बिग बॉस' सीजन 12 आणि आगामी चित्रपट 'भारत'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमान नेहमीच सोशल मीडियावर कुटूंबासोबतचे फोटोज शेअर करत असतो. याच काळात त्याने आपले पालक सलीम खान आणि आई सलमा यांचा इमोशनल फोटो शेअर केला. विशेष म्हणजे या फोटोमध्ये आजी-आजोबांसोबत नात एलिजा अग्निहोत्री दिसतेय. एलिजा आपल्या आजी-आजोबांच्या खुप जवळ आहे आणि हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सलमानची भाजी एलिजा अग्निहोत्री खुप कमी प्रसंगी दिसत असते. 


लाइमलाइटपासून दूर राहते एलिजा 
- सलमानच्या चाहत्यांना त्याच्या कुटूंबातील जास्तीत जास्त सदस्यांविषयी माहिती आहे. त्याचे वडील आणि भाऊ अरबाज, सोहेल, बहीण अलवीरा आणि अर्पिताला सर्वच ओळखतात. परंतू आता भाची एलिजाही आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत आहे.
- सलमानची भाची लाइमलाइटपासून दूर राहते. परंतू तिला फोटो काढण्याची खुप आवड आहे. एलिजा इंस्टाग्रामवर अकाउंटवर तिच्या डिफरेंट लूक आणि स्टायलिश फोटोज शेअर करत असते.
- सलमानची बहीण अलवीरा खानचे लग्न अॅक्टर-प्रोड्यूसर अतुल अग्निहोत्रीसोबत झाले आहे. एलिजा तिची मोठी मुलगी आहे. दोघांना अयान हा एक मुलगाही आहे.
- एलिजा सध्या मुंबईच्या स्कूलमध्ये शिक्षण घेतेय. ती नेहमीच फ्रेंड्ससोबत मस्ती करताना दिसत असते. परंतू ती मीडिया लाइमलाइटपासून दूरच राहते.
- सलमानची भाची लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असेही वृत्त होते. परंतू सध्यातरी याविषयी कोणतीही अनाउंसमेंट झालेली नाही.

 

 


Loading...

Recommended


Loading...