Loading...

अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेले होते या अभिनेत्याचे शेवटचे दिवस, उपाचारांसाठी पैसे नव्हते तर 'शोले'च्या को-अॅक्टरने दिले होते 20 लाख

225 चित्रपटांमध्ये झळकलेल्या हंगल यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले होते.

Divya Marathi Aug 25, 2018, 11:45 IST

एंटरटेन्मेंट डेस्कः गाजलेल्या 'शोले' या चित्रपटातील इमाम साहेबांची व्यक्तिरेखा कोण विसरु शकतो... चित्रपटातील त्यांच्यावर चित्रीत झालेला 'इतना सन्नाटा क्यों है भाई ?' हा संवाद आजही प्रसिद्ध आहे. या एका संवादाने अभिनेते ए.के.हंगल यांना प्रसिद्ध बनवले होते. 225 चित्रपटांमध्ये झळकलेल्या हंगल यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले होते.  26 ऑगस्ट 2012 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. अखेरच्या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची झाली होती. त्यांच्याजवळ उपचारांसाठी आणि औषधं विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. 

 

वयाच्या 52 व्या वर्षी केला अभिनय क्षेत्रात प्रवेश...
- ए.के. हंगल हे अभिनेता होण्यापूर्वी फ्रीडम फायटर होते. नशीब पालटल्याने ते फिल्मी दुनियेत आले. वयाच्या 52 व्या वर्षी बासु भट्टाचार्य यांच्या 'तीसरी कसम' (1966) या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 

- त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका वठवल्या. आपल्या 40 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी 225 चित्रपटांमध्ये काम केले होते.

- पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित हंगल यांना अखेरच्या काळात एका छोट्याशा खोलीत जीवन व्यतीत करावे लागले होते. वयाच्या 95 व्या वर्षी ते खंडर झालेल्या घरात आपल्या मुलासोबत राहात होते.

 

अमिताभ बच्चन यांनी दिले होते 20 लाख रुपये

ए.के. हंगल यांच्या मुलाजवळ जेव्हा त्यांच्या उपचारांसाठी पैसे नव्हते तेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्यांना 20 लाखांची मदत केली होती. सोबतच करण जोहरसह अनेकांनी त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला होता. 

 

बाथरूममध्ये पडले होते...
13 ऑगस्ट 2012  रोजी ते बाथरुममध्ये पडले होते, त्यामुळे त्यांच्या पायाचे हाड मोडले होते आणि पाठीलाही मार बसला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली नव्हती. प्रकृती ढासळत गेल्याने त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. हळूहळू त्यांच्या फुफ्फुसांनी काम करणे बंद केले होते, त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली होती. 2008 साली आलेल्या 'हमसे है जमाना' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. तर 2012 मध्ये ते 'मधुबाला: एक इश्क एक जुनून' या मालिकेत त्यांनी कॅमिओ भूमिका साकारली होती. 

 

'शोले'शिवाय त्यांचे गाजलेले निवडक सिनेमे पुढीलप्रमाणे : 
शागिर्द (1967), बावर्ची (1972), अभिमान (1973), नमक हराम (1973), आपकी कसम (1974), दीवार (1975), चितचोर (1976), ईमान धरम (1977), बेशरम (1978), खानदान (1979), जुदाई (1980), नरम गरम (1981), शौकीन (1982), अवतार (1983), शराबी (1984), मेरी जंग (1985), डकैत (1987), खून भरी मांग (1988), फरिश्ते (1991), खलनायक (1993), दिलवाले (1994), शरारत (2002) आणि पहेली (2005)


Loading...

Recommended


Loading...