Loading...

मृत्यूसमयी रुग्णालयात एकटीच होती 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'ची ही अॅक्ट्रेस, मुलगा-मुलगी कुणीही केली नव्हती साधी विचारपूस

यूएसमध्ये राहणारा त्यांचा मुलगा ज्योतिन किंवा मुंबईत राहणा-या त्यांच्या मुलीने त्यांची विचारपूसदेखील केली नव्हती.

Divya Marathi Sep 07, 2018, 13:06 IST

मुंबईः 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'(1995 ) या चित्रपटातील सिमरन अर्थात काजोलच्या आजीची भूमिका साकारणा-या अभिनेत्री अचला सचदेव यांचा जन्म 3 मे 1920 रोजी पेशावर, पाकिस्तानात झाला होता. 30 एप्रिल 2012 रोजी पुण्यातील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या अभिनयाने एक काळ गाजवणा-या या अभिनेत्रीच्या अंतिम समयी त्यांच्याजवळ कुणीही नव्हते. यूएसमध्ये राहणारा त्यांचा मुलगा ज्योतिन किंवा मुंबईत राहणा-या त्यांच्या मुलीने त्यांची विचारपूसदेखील केली नव्हती.

 

नव-याच्या निधनानंतर एकटी पडली होती  'ए मेरी जोहरा जबीं' गाण्यातील ही अभिनेत्री... 
- अचला सचदेव यांना वक्त (1965) या चित्रपटासाठी ओळखले जाते. या चित्रपटात त्यांनी बलराज सहानींच्या पत्नीची भूमिका साकारली होती. अचला आणि बलराज यांच्यावर  चित्रीत झालेले 'ए मेरी जोहरा जबीं' हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले होते. हे गाणे आजही सिनेरसिकांच्या ओठी रेंगाळत असते. 2002 साली त्यांचे पती क्लिफर्ड डगलस पीटर्स यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाच्या 12 वर्षांपर्यंत त्या पुण्यानजीकच्या कोणार्क इस्टेट अपार्टमेंटच्या दोन बेडरुमच्या फ्लॅटमध्ये एकट्या राहात होत्या. त्याकाळात फक्त एक अटेंडर रात्रीच्या वेळी त्यांची देखभाल करत होता.

 

सप्टेंबर 2011: किचनमध्ये पडल्या आणि रुग्णालयात दाखल झाल्या...

- 8 सप्टेंबर 2011 रोजी अचला सचदेव या किचनमध्ये पाणी घेण्यासाठी गेल्या असताना त्या कोसळल्या. पडल्याने त्यांच्या पायाचे हाड मोडले. त्यांना पुण्यातील पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. काही दिवसांतच त्यांना डिस्चार्जही मिळाला. पण अचानक अचला यांच्या मेंदुत रक्त गोठायला लागले. त्यांना क्वाड्रिप्लेजिया (पॅरालाइजचा प्रकार) झाला होता. 21 ऑक्टोबर 2011 रोजी अचला यांना उपचारांसाठी पुन्हा त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयाच्या एका बेडवर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

फॅमिली फ्रेंडने बॉलिवूडच्या लोकांना दिली निधनाची बातमी... 
अचला सचदेव यांचे फॅमिली फ्रेंड राजीव नंदा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांनीच बॉलिवूडमधील अचला सचदेव यांच्या ओळखीतील लोकांशी संपर्क साधून त्यांच्याविषयी सांगितले होते. नंदा यांनी सांगितल्यानुसार, रुग्णालयात अचला यांची देखभाल करणारे जवळचे कुणीच नव्हते.  त्यांना योग्य देखभाल आणि उपचारांची गरज होती. त्यांच्याजवळ दोन फुलटाइम अटेंडेट्स गरजेचे होते. 

 

जनसेवा फाऊंडेशनला दान दिला फ्लॅट.. 
- नव-याच्या निधनानंतर अचला आपला जास्तीत जास्त वेळ संगीत ऐकण्यात आणि मेडिटेशनमध्ये घालवत होत्या. 2006 मध्ये त्यांनी त्यांचा राहता फ्लॅट जनसेवा फाऊंडेशना दान केला होता. त्या बदल्यात फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. विनोद शाह यांनी त्यांची देखभालीची जबाबदारी उचलली होती. शाह यांना जेव्हा अचला यांच्या तब्येतीविषयी विचारणा झाली, तेव्हा त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले होते. नंदा यांच्याप्रमाणेच शाह यांचेही मत होते की, त्यांच्या देखभालीसाठी फूलटाइम दोन अटेंडेंट्सची गरज आहे. त्यांनी हॉस्पिटल स्टाफसोबत यासंदर्भात वाद घातला असता, त्यांना तेथून काढण्यात आले होते. शाह यांनी अखेरच्या काळापर्यंत अचला यांची काळजी घेतली.

 

यश चोप्रा यांनी घालून दिली होती अचला आणि पीटर्स यांची भेट... 
- राजीव नंदा यांनी सांगितल्यानुसार, अचला आणि क्लिफर्ड डगलस पीटर्स यांची पहिली भेट पुण्यात झाली होती. यश चोप्रा यांनीच अचला आणि पीटर्स यांची भेट घालून दिली होती. त्याकाळात पीटर्स यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते, तर अचला या घटस्फोटित होत्या. पहिल्या भेटीनंतर काही दिवसांनी दोघांनी लग्न केले होते. पीटर्स हे मॅकेनिकल इंजिनिअर होते आणि भोसरीमध्ये त्यांची फॅक्ट्री होती. पुण्यातील हडपसर या भागात शिफ्ट होण्यापूर्वी त्यांचा भोसरी येथे बंगला होता. नंदा यांनी सांगितल्यानुसार, पीटर्स कायम अचला यांना चित्रपटांमध्ये अॅक्टिव राहण्यासाठी मोटिवेट करायचे.  

 

ज्योति आहे अचला आणि त्यांच्या पहिल्या पतीचा मुलगा... 
- ज्योतिन हा अचला आणि त्यांच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे. अचला यांच्या निधनापुर्वी ज्योतिन फार क्वचितच त्यांना भेटायला येत असे. 2006 मध्ये अचला त्यांच्या नातीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी यूएसला गेल्या होत्या. 


अचला यांचे गाजलेले चित्रपट 
आरजू (1965)
वक्त (1965)
मेरा नाम जोकर (1970)
हरे रामा हरे कृष्णा (1971)
चांदनी (1989)
दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (1995)
कभी खुशी गम (2001)
कल हो न हो (2003)

 


Loading...

Recommended


Loading...