Loading...

क्रोएिशया पहिल्यांदाच फायनलमध्ये; माजी चॅम्पियन इंग्लंडला नमवले, आता गाठ फ्रान्सशी

सेमीफायनलमध्ये बुधवारी क्रोएशियाने माजी चॅम्पियन इंग्लंड टीमला पराभूत करत पहिल्यांदा फायनलमध्ये धडक मारली.

Divya Marathi Jul 12, 2018, 08:50 IST

मॉस्को- फिफा विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये बुधवारी क्रोएशियाने माजी चॅम्पियन इंग्लंड टीमला पराभूत करत पहिल्यांदा फायनलमध्ये धडक मारली. अतिरिक्त वेळेत पोहोचलेल्या रोमांचक लढतीत इंग्लंडला २-१ गोलने मात दिल्यानंतर आता क्रोएशिया १५ जुलै रोजी फायनलमध्ये माजी विजेता फ्रान्सला टक्कर देईल. मुख्य लढत १-१ गोलने बरोबरीत राहिली होती. त्यानंतर अतिरिक्त वेळेत खेळताना १०९ व्या मिनिटाला क्रोएशियाच्या मांडजकिकने निर्णायक गोल करत संघाला २-१ ने आघाडी मिळवून दिली. 


स्पर्धेत  इंग्लंडच्या ट्रिपियरने पाचव्या मिनिटाला फ्री किकवर गोल करत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर इंग्लंड खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले.  क्रोएशियाने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जाेरावर पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश केला. फायनलमध्ये क्रोएशियाने अजिंक्यपद मिळवले, तर जगाला यंदा नवा चॅम्पियन मिळू शकतो. क्रोएशिया टीम सध्या जागतिक क्रमावारीत २० व्या स्थानी आहे. फ्रान्स टीम क्रमवारीत ७ व्या स्थानी विराजमान आहे. 


आता लक्ष फायनलकडे : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेला अंतिम सामना १५ जुलै रोजी रात्री ८ वाजता मॉस्कोत होणार आहे. 


हेही महत्त्वाचे  
> क्रोएशियाने विश्वचषकात सलग तिसरा सामना अतिरिक्त वेळेत पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकला.
> क्रोएशियाची प्री-क्वार्टरमध्ये डेन्मार्क व क्वार्टर फायनलमध्ये रशियाला पेनल्टी शूटआऊटवर मात.
> क्रोएशिया विश्वचषकात सलग तीन सामन्यांत अतिरिक्त वेळत खेळणारा दुसरा देश बनला. १९९० मध्ये इंग्लंडने अशी कामगिरी केली.
> तिसऱ्या स्थानासाठी शनिवारी इंग्लंड आणि बेल्जियम यांच्यात सामना.


१९९८ मध्ये विश्वचषकात एंट्री 
क्रोएशिया १९९० मध्ये स्वतंत्र देश बनला आहे. त्यानंतर अवघ्या ८ वर्षांत क्रोएशियाच्या फुटबॉल संघाने १९९८ मध्ये फिफा विश्वचषकात पदार्पण केले. या टीमने पहिले यजमान आणि विजेत्या बनलेल्या फ्रान्सला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली होती. 


किताबावेळी १७ खेळाडूंचा जन्मही नाही  
फिफा विश्वचषकाच्या विजयाचा आनंद इंग्लंड संघाने एकदा घेतला आहे. त्यांनी १९९६ मध्ये किताब आपल्या नावे केला आहे. त्यानंतर १९९० मध्येही अंतिम ४ जणांत इंग्लंडने स्थान मिळवले होते. सध्याच्या टीममधील २३ पैकी १७ खेळाडूंचा जन्मदेखील त्या वेळी झाला नव्हता. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकाला आठवणीतील बनवायचे आहे.   


Loading...

Recommended


Loading...