Loading...

Asian Games मध्ये देशाला सुवर्ण देणारा खेळाडू आज पै-पै साठी मजबूर; पत्नीकडून मदतीचे आवाहन

भारताचे नाव अख्ख्या जगात चमकवणारे हाकम सिंग (64) सध्या पंजाबच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.

Divya Marathi Jul 30, 2018, 17:51 IST

संगरूर - भारताचे नाव अख्ख्या जगात चमकवणारे हाकम सिंग (64) सध्या पंजाबच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. त्यांची किडनी बिघडली आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये भारतासाठी अनेक पदके कमवली. परंतु, स्वतःसाठी पैसा ते कमवू शकले नाहीत. उपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी सुद्धा त्यांच्याकडे काहीच नाही. त्यांच्या पत्नी अधिकारी आणि सरकारला विनंत्या करून दमल्या आहेत. परंतु, एकही नेता त्यांच्या मदतीला धावून आलेला नाही. एक खेळाडू जेव्हा देशासाठी मेडल आणतो तेव्हा अख्खा देश त्याला आपल्या डोक्यावर बसवतो. परंतु, या खेळाडूंना जेव्हा म्हातारपण येते तेव्हा त्यांची काय अवस्था होते हे संगरूर जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल असलेल्या हाकम सिंग यांना पाहून येईल अशी प्रतिक्रिया त्यांच्या पत्नी देत आहेत. 


एशिन गेम्समध्ये जिंकला होता गोल्ड
1978 मध्ये बँकॉक एशियन गेम्सच्या 20 किमी पैदल चाल या स्पर्धेत एक सैनिक राहिलेले हाकम सिंग यांनी भारतासाठी गोल्ड जिंकला. 1979 टोक्यो येथे पार पडलेल्या एशियन ट्रॅक अॅन्ड फील्ड गेम्समध्ये सुद्धा त्यांनी भारताला सुवर्ण मिळवून दिले. 1972 मध्ये भारतीय सैन्यात भरती झालेले फौजी हाकम सिंग यांनी 1987 मध्ये निवृत्ती घेतली होती. यानंतरही त्यांनी देशसेवा सोडली नाही. निवृत्ती घेऊन त्यांनी पंजाब पोलिसांत कोचची भूमिका घेतली. क्रीडा क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 29 ऑगस्ट 2008 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते ध्यान चंद पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. एखाद्या खेळाडूने देशाची गोल्ड मेडल मिळवला की लोक त्यांच्या मिरवणुका काढतात. त्यांना आपल्या डोक्यावर बसवतात. परंतु, हे लोक काही वर्षांनी त्यांना विसरून जातात. आज घडीला एकही नेता किंवा सरकारचा अधिकारी त्यांना पाहण्यासाठी सुद्धा तयार नाही अशी खंत हाकम सिंग यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे. 


Loading...

Recommended


Loading...