Loading...

अन् भज्जी घाबरला! श्रीसंतने बनवली अशी Body; फॅन्स म्हणाले, आता घे चापटाचा बदला

आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये अर्थात 2008 मध्ये झालेल्या सामन्यात हरभजन सिंगने श्रीसंतच्या कानाखाली लगावली होती.

Divya Marathi Jul 08, 2018, 14:36 IST

स्पोर्ट्स डेस्क - लाइफटाइम बॅनला सामोरे जाणारा भारताचा माजी क्रिकेटर एस. श्रीसंत पुन्हा चर्चेत आला आहे. त्याने नुकताच आपल्या बॉडी बिल्डिंगचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. टीव्ही सीरियल आणि राजकारणात नशीब आजमावून पाहिलेला 35 वर्षीय श्रीसंत नव्या इनिंगच्या तयारीत आहे. लवकरच तो कन्नड फिल्म केंपागोडा-2 मध्ये अॅक्टिंग करणार आहे. याचवर्षी रिलीझ होणाऱ्या या चित्रपटासाठी त्याने ही बॉडी आणि सिक्स पॅक अॅब बनवले आहेत. आपल्या लुक्समुळे तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु, फॅन्स त्याला नव्हे, तर चक्क हरभजन सिंगला ट्रोल करत आहेत. 


बदला घे श्रीसंत...
- श्रीसंतचा बदललेला लुक पाहून सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले जात आहे. सोबतच, अनेक जण या फोटोंवरून हरभजन सिंगला ट्रोल करत आहेत. 
- 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये क्रिकेटचा सर्वात मोठा वाद झाला होता. त्यावेळी किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्सच्या सामन्यात हरभजनने लाइव्ह मॅचमध्ये श्रीसंतच्या कानाखाली लावली होती. या घटनेनंतर श्रीसंतला इशारा देऊन सोडण्यात आले होते. तर भज्जीला सीझनमध्ये बॅन करण्यात आले. 
- या घटनेच्या काही वर्षांनंतर हरभजनने सत्य सांगितले होते. प्रत्यक्षात, मॅच सुरू असताना श्रीसंत वारंवार भज्जीवर कॉमेंट पास करत होता. कित्येकवेळा सांगूनही तो थांबला नाही आणि तसाच चिडवत होता. त्यावर भज्जीला आपला राग आवरला नाही आणि त्याने श्रीसंतला जोरदार चापट लावली होती. आताचा श्रीसंत पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि हरभजनपेक्षा भारदस्त दिसून येत आहे. त्यामुळेच, फॅन्स त्याला आता हरभजनचा बदला घे असे सल्ले देत आहेत. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, श्रीसंतचे आणखी फोटो आणि फॅन्सने केलेले कॉमेंट...


Loading...

Recommended


Loading...