Loading...

Marriage Anniversary: ही एक चूक केली नसती तर झालाच नसता साक्षी-धोनीचा विवाह

भारताचा स्टार क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आणि साक्षी धोनी लग्नाचा 8 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Divya Marathi Jul 04, 2018, 16:21 IST

स्पोर्ट्स डेस्क - भारताचा स्टार क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आणि साक्षी धोनी लग्नाचा 8 वा वाढदिवस साजरा करत आहेत. कॅप्टनशिप सोडून जमाना झाला, तरी आजही तो कॅप्टन कूल या नावानेच ओळखला जातो. मँचेस्टर टी-20 साठी हे दोघे सध्या लंडनमध्ये आहेत. त्यामुळे, दोघांनी तेथेच आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर धोनी आणि साक्षीने 4 जुलै 2010 रोजी विवाह केला. अतिशय खासगी अशा सोहळ्यात आणि फक्त जवळच्या मित्र-परिवारांच्या उपस्थितीत त्यांचे लग्न पार पडले. धोनी आणि साक्षीच्या लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे. साक्षीने धोनीच्या पहिल्या भेटीत एक चूक केली होती. तिने ही चूक केली नसती तर कदाचित या दोघांचा विवाह देखील झालाच नसता. 


पहिल्या भेटीतच केली ही चूक...
- महेंद्र सिंह धोनी आणि साक्षी यांची पहिली भेट 2007 मध्ये एका हॉटेलात झाली होती. त्यावेळी धोनी कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यासाठी पोहोचला होता. याच ठिकाणी असलेल्या ताज हॉटेलात धोनीचा स्टे होता. 
- हॉटेल मॅनेजमेंटची विद्यार्थिनी साक्षी त्यावेळी इंटर्नशिप निमित्ताने कोलकातातील ताज हॉटेलमध्ये कार्यरत होती. याच हॉटेलात दोघांची भेट झाली होती. याच भेटी दरम्यान साक्षीने एक चूक केली होती. 
- हॉटेलमध्ये थांबलेला असताना धोनीच्या हातून आपल्या रुमचा की-कार्ड हरवला होता. आपल्या रुमचे दार उघडण्यास असमर्थ असल्याने तो रिसेप्शनला पोहोचला आणि कार्ड हरवल्याचे सांगितले. त्या काउंटरवर साक्षी तैनात होती. 
- आपल्याच कामात गुंग असणाऱ्या साक्षीने ती तक्रार ऐकूण घेतली. यानंतर त्याला नाव विचारले. साऱ्या देशात ज्या नावाच्या चर्चा होत्या, त्याच व्यक्तीला साक्षी नाव विचारत होती. धोनीने सहज हसतमुखाने आपले नाव सांगितले. यानंतर तिने की-कार्ड हातात घेऊन स्वतः धोनीला रुमपर्यंत सोडले. प्रत्यक्षात आपल्या कामात नेहमीच व्यस्त असणाऱ्या साक्षीला तो कोण होता हे माहितीच नव्हते. 

 

धोनीनेच घेतला ऑटोग्राफ...
तिने आपल्या स्टाफला घटनेची माहिती दिली. त्यावर सहकाऱ्यांना धक्काच बसला. यानंतर मॅनेजर आणि सहकाऱ्यांसह साक्षी एक बुके घेऊन धोनीच्या रुमवर गेली आणि माफी मागितली. साक्षीचा हाच प्रामाणिकपणा धोनीला आवडला आणि त्याने बुके घेताना साक्षीचा ऑटोग्राफ घेतला. तेव्हापासूनच दोघांमध्ये मैत्री झाली आणि एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. 

 


Loading...

Recommended


Loading...