Loading...

एका ऋषींच्या शापामुळे यमदेवालाही घ्यावा लागला होता मनुष्य अवतार

धर्म ग्रंथानुसार, मनुष्याच्या मृत्यूनंतर यमदूत मृत व्यक्तीच्या आत्मा यमदेवाकडे घेऊन जातात.

Divya Marathi May 08, 2018, 09:18 IST

धर्म ग्रंथानुसार, मनुष्याच्या मृत्यूनंतर यमदूत मृत व्यक्तीच्या आत्मा यमदेवाकडे घेऊन जातात. येथे यमदेव व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला स्वर्ग किंवा नरकात पाठवतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, यमदेवालाही एका ऋषींच्या शापामुळे पृथ्वीवर मनुष्य रूपात जन्म घ्यावा लागला होता. येथे जाणून घ्या, संपूर्ण कथा...


मांडव्य ऋषींचा यमदेवाला शाप
महाभारतानुसार, मांडव्य नावाचे एक ऋषी होते. राजाने चुकीने त्यांना चोरीच्या आरोपाखाली दोषी ठरवून सुळावर चढवण्याची शिक्षा सुनावली. सुळावर काही दिवस राहूनही जेव्हा त्यांचे प्राण गेले नाहीत, तेव्हा राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी मांडव्य ऋषींची क्षमा मागून त्यांना सोडून दिले. त्यानंतर मांडव्य ऋषी यमदेवाकडे गेले आणि यमदेवाला विचारले की, मी असा कोणता गुन्हा केला होता ज्यामुळे मला अशाप्रकारे खोट्या आरोपाची शिक्षा भोगावी लागली. तेव्हा यमदेवाने सांगितले की, तुम्ही 12 वर्षांचे असताना एका भुंग्याला सुई टोचवली होती, त्या फळस्वरुपात तुम्हाला हे दुःख भोगावे लागले. तेव्हा मांडव्य ऋषी यमदेवाला म्हणाले की, 12 वर्षाच्या वयात तर कोणालाही धर्म-अधर्माचे ज्ञान नसते. तुम्ही छोट्या अपराधाची मला मोठी शिक्षा दिली आहे. यामुळे मी तुम्हाला शाप देतो की, तुम्हाला क्षुद्र योनीत एका दासी पुत्राच्या रुपात जन्म घ्यावा लागेल. ऋषी मांडव्य यांच्या याच शापामुळे यमदेवाने महात्मा विदुर रुपात जन्म घेतला.


पुढील स्लाईडवर वाचा, विदुराचा कसा झाला मृत्यू...


Loading...

Recommended


Loading...