Loading...

या दिशेला घराचे मेन डोअर असल्यास होऊ शकतो धनलाभ आणि मिळते शुभफळ

घर बांधण्यासाठी प्लॉटची निवड करताना काही खास गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

Divya Marathi Apr 24, 2018, 15:27 IST

घर बांधण्यासाठी प्लॉटची निवड करताना काही खास गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. उदा. प्लॉटचे मुख कोणत्या दिशेला आहे. प्लॉटच्या ईशान्य (उत्तर-पूर्व)ला रस्ता असल्यास घर ईशान्यमुखी म्हणजेच ईशान्यभिमुख असते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार अशाप्रकारचा प्लॉट बुद्धिमान अपत्य तसेच शुभफळ प्रदान करणारा असतो. ईशान्य दिशेचे स्वामी भगवान रुद्र (शिव) तसेच प्रतिनिधी ग्रह बृहस्पती आहेत. ईशान्य मुखी प्लॉटवर घर बांधताना या वास्तू सिद्धांताचे पालन करावे.


1. ईशान्य मुखी प्लॉट ऐश्वर्य, लाभ, वंश वृद्धी, बुद्धिमान संतान आणि शुभ फळ देणारा असतो.
2. अशा प्लॉटवर घर बांधताना हा कोपरा कापलेला असू नये. प्रयत्न करा की प्रत्येक रूममधील ईशान्य कोपरा रिकामा राहील.
3. ईशान्य कोपरा बंद करू नये आणि येथे कोणतेही जड सामानही ठेवू नये. ईशान्य मुखी प्लॉटच्या पुढील भाग रिकामा ठेवणे शुभ राहते.
4. ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवावा, येथे कचरा, घाण टाकू नये. झाडूही ठेवू नये.
5. ईशान्य मुखी प्लॉटच्या समोर नदी, तलाव किंवा विहीर असल्यास हे सुख-संपत्तीचे प्रतीक आहे.
6. ईशान्य कोपऱ्यात किचन असू नये, अन्यथा घरात अशांती, कलह आणि धनहानी होण्याची शक्यता राहते.
7. घरातील पाणी ईशान्य दिशेकडून बाहेर काढावे. फरशीचा उताराही ईशान्य दिशेकडे ठेवा.


Loading...

Recommended


Loading...