Loading...

हवे असेल स्वतःचे घर आणि पैसा तर आज रात्री करा हे 2 सोपे उपाय

आज (27 जुलै, शुक्रवार) चंद्रग्रहण आहे. सामन्यतः ग्रहण अशुभ मानले जाते परंतु या काळात करण्यात आलेल्या ज्योतिषीय उपायांनी

Divya Marathi Jul 27, 2018, 11:19 IST

आज (27 जुलै, शुक्रवार) चंद्रग्रहण आहे. सामन्यतः ग्रहण अशुभ मानले जाते परंतु या काळात करण्यात आलेल्या ज्योतिषीय उपायांनी लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार धनलाभ आणि स्वतःचे घर हवे असल्यास चंद्रग्रहण काळात येथे सांगण्यात आलेले उपाय करू शकता...


धनलाभासाठी उपाय 
ग्रहण सुरु होण्यापूर्वी स्नान करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. ग्रहण काळ सुरु झाल्यानंतर उत्तर दिशेला तोंड करून कुशच्या आसनावर बसा. समोर एक चौरंग घेऊन एका ताटात स्वस्तिक किंवा ऊँ काढून त्यावर महालक्ष्मी यंत्र स्थापित करा. त्यानंतर एक शंख दुस-या ताटात स्थापीत करा. थोडे तांदूळ केशरात रंगवून ते त्या शंखात टाका. शुद्ध तुपाचा दिवा लावून खाली दिलेल्या मंत्राचा 11 माळ जप करा.

मंत्र
सिद्धि बुद्धि प्रदे देवि मुक्ति मुक्ति प्रदायिनी।
मंत्र पुते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते।।


जप झाल्यानंतर सर्व सामग्री नदीत किंवा तलावात विसर्जित करा. हा उपाय केल्याने थोड्या दिवसातच तुम्हाला अचानक धनलाभ होईल.

 

स्वतःच्या घरासाठी उपाय 
ग्रहण सुरु होण्यापूर्वी आंघोळ करून स्वच्छ पांढ-या रंगाचे कपडे परिधान करावेत. त्यानंतर लोकारीचे आसन घेऊन उत्तरेकडे तोंड करून बसावे. आपल्यासमोर एक ताट ठेवावे. त्यानंतर एक पत्राळ घेऊन त्यावर केशराने आपल्या स्वतःचे घर असावे, या शब्दांत आपली इच्छा त्यावर लिहावी. त्यानंतर 108 वेळेस खाली सांगितलेल्या मंत्राचा जप करावा.


ऊँ देवोत्थाय नमः


आता एक मोतीशंख घ्या. तो पत्राळीत गुंडाळून घरापासून लांब असलेल्या वडाच्या झाडाखाली ठेऊन या.


Loading...

Recommended


Loading...