Loading...

चंद्रग्रहणाशी संबंधित 11 प्रश्नांची उत्तरे, काय करावे आणि काय करू नये

आज (शुक्रवार, 27 जुलै) रात्री पूर्ण चंद्रग्रहण होईल. हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्म

Divya Marathi Jul 27, 2018, 12:57 IST

आज (शुक्रवार, 27 जुलै) रात्री पूर्ण चंद्रग्रहण होईल. हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार चंद्र ग्रहण जवळपास 3 तास 55 मिनिटांचे राहील. हे ग्रहण या शतकातील सर्वात मोठे आहे. येथे जाणून घ्या, चंद्र ग्रहणाशी संबंधित 11 प्रश्नांची उत्तरे


Q.1- कितीवेळ असणार चंद्रग्रहण?
A. हे ग्रहण 27 जुलैला रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी सुरु होऊन 28 जुलैला पहाटे 3 वाजून 49 मिनिटांनी समाप्त होईल.


Q.2- चंद्रग्रहण भारताव्यतिरिक्त इतर कोणकोणत्या ठिकाणी दिसेल?
A. चंद्रग्रहण भारतासोबतच अंटार्टिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका आणि मध्य-पूर्व भागात दिसेल. रुसच्या काही भागांमध्ये हे ग्रहण दिसणार नाही.


Q. 3- 27 जुलैला चंद्रग्रहणासोबत आणखी काय विशेष?
A. पंचांगानुसार 27 जुलैला गुरुपौर्णिमासुद्धा आहे. या दिवशी सर्वार्थसिद्धी योग जुळून येत आहे. या योगामध्ये आपल्या गुरुची विशेष पूजा करावी आणि सर्वार्थ सिद्धी योगात शुभ काम केल्यास यश प्राप्त होऊ शकते.


Q.4- ग्रहणाचा सुतक काळ केव्हा सुरु होईल?
A. ग्रहणाचा सुतक काळ ग्रहण सुरु होण्याच्या 9 तास आधी होईल. म्हणजेच दुपारी 2 वाजून 54 मिनिटांनी ग्रहण काळ सुरु होईल.


Q. 5- ग्रहणापूर्वी काय करू नये?
A. ग्रहणाच्या सुतक काळात जेवण करू नये. स्वयंपाकात केलेले पदार्थ ग्रहण काळात घरात ठेवू नयेत. खाण्यापिण्याच्या गोष्टी ठेवायच्या असल्यास त्यावर तुळशीचे पान अवश्य ठेवावे.


Q.6- ग्रहण झाल्यानंतर काय करावे?
A. चंद्रग्रहण समाप्तीनंतर म्हणजे 28 जुलैला पहाटे 3 वाजून 49 मिनिटानंतर संपूर्ण घराची स्वच्छता करावी. देवघरातील मूर्तीना स्नान घालून पूजा करावी.


Q.7- कसे होते चंद्रग्रहण? 
A. विज्ञानानुसार, जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण होते. या दरम्यान सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते, ज्यामुळे सूर्यप्रकाश चंद्रापर्यंत पोहोचत नाही. पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यामुळे चंद्र दिसत नाही. या स्थितीला चंद्र ग्रहण म्हणतात.


Q.8- ग्रहणाची धार्मिक मान्यता काय आहे?
A. ग्रहणासंदर्भात धार्मिक मान्यता विज्ञानापेक्षा खूप वेगळी आहे. शास्त्रानुसार, प्राचीन काली समुद्र मंथनातून अमृत निघाले होते. या अमृताचे सेवन भगवान विष्णू मोहिनी रूपात सर्वांना करत होते. या दरम्यान राक्षस राहूने देवतांचे रूप धारण करून अमृतपान केले. सूर्यदेव आणि चंद्रदेवाने हे ओळखले आणि भगवान विष्णूंना सांगितले. यामुळे श्रीविष्णू यांनी सुदर्शन चक्राने राहूचे शीर धडापासून वेळगे केले. तेव्हापासून राहू सूर्य आणि चंद्राला ग्रासतो म्हणजे गिळून घेतो. जेव्हा-जेव्हा सूर्य किंवा चंद्राला राहू ग्रासतो तेव्हा ग्रहण होते.


Q.9- कुंडलीमध्ये कसा तयार होतो ग्रहण योग?
A. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कोणत्याही स्थानामध्ये सूर्य किंवा चंद्रासोबत राहू किंवा केतूची युती होते, तेव्हा ग्रहण योग तयार होतो. या योगामुळे व्यक्तीला मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन प्रश्नांची उत्तरे...


Loading...

Recommended


Loading...