Loading...

आग, शत्रू आणि आजाराला कधीही लहान समजू नये, करू शकतात मोठे नुकसान

श्रीरामचरितमानसच्या आरण्यकांडात जेव्हा लक्ष्मण शूर्पणखाचे नाक, कान कापतात तेव्हा ती रावणाकडे जाते आणि सांगते

Divya Marathi Jul 01, 2018, 15:32 IST

श्रीरामचरितमानसच्या आरण्यकांडात जेव्हा लक्ष्मण शूर्पणखाचे नाक, कान कापतात तेव्हा ती रावणाकडे जाते आणि सांगते की, कोणत्या सहा गोष्टींना लहान म्हणजे कमजोर समजू नये. आज आम्ही तुम्हला याच सहा गोष्टींबद्दल सांगत आहोत...


रिपु रुज पावक पाप प्रभु अहि गनिअ न छोट करि।
अस कहि बिबिध बिलाप करि लागी रोदन करन।।


अर्थ- शत्रू, रोग, अग्नी, पाप, स्वामी आणि सर्प यांना कधीही लहान समजू नये. हे सांगून शूर्पणखा विविध प्रकारे विलाप करत रडू लागली.


अग्नी -
अग्नीमध्ये एवढी शक्ती असते की, थोड्याच वेळात मोठ्यातील मोठे जंगल राख होऊ शकते. अग्नीचे सर्वात छोटे रूप एक ठिणगी असते. परंतु जेव्हा ही ठिणगी विक्राळ रूप धारण करते तेव्हा यावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसते. यामुळे आगीसोबत कधी खेळू नये.


शत्रू -
शत्रू आपल्यापेक्षा कितीही लहान असला तरी त्याच्यापासून सावध राहावे. कारण अनेकदा छोटे शत्रू असे काही काम करून जातात की, नंतर पश्चाताप करावा लागतो. जर छोटे-छोटे शत्रू राजे एकत्रित होऊन चक्रवर्ती राजावर चालून गेले तर त्या राजाचा पराभव होऊ शकतो. यामुळे शत्रूला कधीही लहान आणि कमकुवत समजू नये.


इतर कोणत्या गोष्टीना कमजोर समजू नये हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...


Loading...

Recommended


Loading...