Loading...

आज रात्री चुकूनही करू नयेत हे 5 काम, अन्यथा घडू शकते काही अशुभ

शुक्रवार 27 जुलैच्या रात्री पूर्ण चंद्रग्रहण होईल. हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा

Divya Marathi Jul 27, 2018, 10:06 IST

शुक्रवार 27 जुलैच्या रात्री पूर्ण चंद्रग्रहण होईल. हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार चंद्रग्रहण जवळपास 3 तास 55 मिनिट राहील. हे ग्रहण 27 जुलै 2018 च्या रात्री जवळपास 11 वाजून 54 मिनिटांनी ग्रहण चालू होऊन 28 जुलै 2018 च्या पहाटे 3 वाजून 49 मिनिटांपर्यंत दिसेल. ग्रहण काळ म्हणजे 27 जुलैच्या रात्री शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले काही काम करणे वर्ज्य आहे. हे काम या काळात केल्यास याचे अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात. येथे जाणून घ्या, ग्रहण काळात कोणकोणती कामे करू नयेत...


पहिले काम
सुतक काळात पूजा-पाठ करू नये. ग्रहणाचा सुतक काळ ग्रहण सुरु होण्याच्या 9 तास अगोदर सुरु होते. सुतक काळात सर्व पूजन कर्म वर्ज्य आहेत. यामुळे या काळात मंदिराचे पटही बंद केलेले असतात.


दुसरे काम 
ग्रहण काळात मोठमोठ्या मंत्र जप करू नये. मंत्र जप करायचा असल्यास एखाद्या स्थान ठिकाणी बसून मनातल्या-मनात देवाचे नाम-स्मरण करावे.


तिसरे काम 
ग्रहण काळात पती-पत्नीने संबंध प्रस्थापित करू नयेत. या काळातील समागमामुळे जन्माला आलेल्या अपत्याला जीवनात विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. यासोबतच पती-पत्नीच्या आरोग्यावर याचा वाईट प्रभाव पडू शकतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, ग्रहण काळात इतर कोणती दोन कामे करू नयेत...

 


Loading...

Recommended


Loading...