Loading...

शिकवण : बादली दाेन्हीकडून रिकामी, यामध्ये दडला आहे आयुष्याचा सार

अामची जी इच्छा असेल ती पूर्ण झाली तर अापण समाधानी हाेऊ, असा विचार अापण करत असताे.

Divya Marathi Jun 04, 2018, 10:45 IST

अामची जी इच्छा असेल ती पूर्ण झाली तर अापण समाधानी हाेऊ, असा विचार अापण करत असताे. परंतु जाेपर्यंत ती इच्छा पूर्ण हाेते ताेपर्यंत हजाराे नवीन इच्छा तयार हाेतात. त्याच्या मागे अाम्ही संमाेहीत हाेऊ पळत राहताे.  मन एखाद्या खड्डाप्रमाणे असते. त्यात अापण पडलाे तर पडत राहताे. कुठे पाेहचू शकत नाही.


एक व्यक्ती प्रसिद्ध फकीर नसरुद्दीनकडे गेला अाणि म्हणाला, मी परमात्माचा शाेध घेऊ इच्छिताे. काही मार्ग सांगा.  नसरुद्दीन म्हणाले, मी अाता विहिरीवर पाणी भरण्यासाठी जात अाहे. तू पण माझ्याबराेबर चल. मी विहिरीत पाणी भरत असताना तुलाही ईश्वराकडे जाण्याचा मार्ग दाखवेल. त्या व्यक्तीस थाेडे अाश्चर्य वाटले. पाणी भरणे अाणि ईश्वराचा संबंध काय? परंतु ताे व्यक्ती नसरुद्दीन यांच्यासाेबत चालू लागला.  नसरुद्दीन यांनी दाेन बादली व दाेर हातात घेतला. त्या व्यक्तीस म्हणाले, मी जाेपर्यंत पाणी भरून घेत नाही, ताेपर्यंत मध्ये प्रश्न विचारू नकाे. ही तुझ्या संयमाची परीक्षा असेल. त्या दाेन बदल्यापैकी एका बादलीत तळ नव्हता. 


नसरुद्दीन यांनी विहिरीत बादली टाकली अाणि पाणी काढले. ते पाणी त्या बादलीत टाकले ज्याला तळ नव्हता. सर्व पाणी वाहून गेले.  नसरुद्दीन यांनी दुसऱ्यांदा बादली विहिरीत टाकली. पाणी काढले. पुन्हा तळ नसलेल्या बदलीत पाणी टाकले. ते पाणी वाहून गेले. अाता त्या व्यक्तीची सहनशक्ती संपली. त्याने अापण काय वचन दिले हाेते, ते विसरला. ताे म्हणाला हा काय मुर्खपणा अाहे.  या बादलीत कधी पाणी थांबणारच नाही. नसरुद्दीन म्हणाले, तुझे मनही असेच अाहे. तळ नसलेल्या बादलीसारखे. अनेक जन्म झाले तरी ताे भरत नाही. खरंतर मन एक कल्पना अाहे. ज्याच्या मागे जाऊन तुम्ही सत्य जाणू इच्छिता.


Loading...

Recommended


Loading...