Loading...

‘रिमोटने चोरी शक्य, ईव्हीएममध्ये घोटाळा का नाही?’ माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव

उत्तर प्रदेशात पंपावरील पेट्रोल चोरीसाठी रिमोट कंट्रोलचा वापर करण्यात आल्याचे प्रकरण समाेर आले आहे. त्यामुळे रिमोटने चोरी शक्य असेल तर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) घोटाळा का नाही ?

Divya Marathi Apr 30, 2017, 03:00 IST
लखनऊ- उत्तर प्रदेशात पंपावरील पेट्रोल चोरीसाठी रिमोट कंट्रोलचा वापर करण्यात आल्याचे प्रकरण समाेर आले आहे. त्यामुळे रिमोटने चोरी शक्य असेल तर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) घोटाळा का नाही ? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे. इलेक्ट्रॉनिक चिप व रिमोटच्या साह्याने पेट्रोल चोरी करण्यात येत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.    त्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. रिमोटने पेट्रोल चोरी होऊ शकत असल्यास ईव्हीएममधील घोटाळाही शक्य आहे. अखिलेश यांनी सातत्याने उत्तर प्रदेशातील निवडणुकीत ईव्हीएम वापराची चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यांच्या शिवाय बसपा प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाच्या मागे ईव्हीएममधील घोटाळा कारणीभूत असल्याचा पहिल्यांदा आरोप केला.  दरम्यान, निवडणुकीत सपाचा पराभव झाला होता. 

Loading...

Recommended


Loading...