Loading...

उत्तर प्रदेशचे माजी मंत्री गायत्री प्रजापतींना जामीन; महिला, तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे प्रकरण

उत्तर प्रदेशचे माजी मंत्री गायत्री प्रजापती यांना पॉस्को न्यायालयाने मंगळवारी महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात जामीन मंजूर केला. एक लाख रुपये रोख तसेच एक लाख रुपयांच्या बाँडच्या जातमुचलक्यावर त्यांना हा जामीन मिळाला आहे.

Divya Marathi Apr 26, 2017, 03:48 IST
नवी दिल्ली- उत्तर प्रदेशचे माजी मंत्री गायत्री प्रजापती यांना पॉस्को न्यायालयाने मंगळवारी महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात जामीन मंजूर केला. एक लाख रुपये रोख तसेच एक लाख रुपयांच्या बाँडच्या जातमुचलक्यावर त्यांना हा जामीन मिळाला आहे. 
पॉस्को न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ओमप्रकाश मिश्रा यांनी मंगळवारी प्रजापती यांच्यासोबत विकास वर्मा अणि अमरेंद्र सिंग यांनाही जामीन मंजूर केला आहे. प्रजापती यांच्यासह सहा अन्य लोकांविरोधात १७ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यानंतर प्रजापती फरार होते. मात्र, महिन्याभरानंतर १५ मार्च रोजी त्यांना अटक करण्यात आली. प्रजापती यांनी २०१४ मध्ये एक महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी अटक टाळण्यासाठी प्रजापती यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंतही धाव घेतली होती. हे आरोप खोटे असल्याचा त्यांचा दावा आहे. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रजापती यांना अमेठी मतदारसंघातून पराभवाचा धक्का बसला होता.

Loading...

Recommended


Loading...