Loading...

हत्‍या करुन युवकाला लटकवले झाडावर, दुपट्ट्याचा तयार केला फंदा

भरतपुरच्‍या नदबई भागात बुधवारी सकाळी एका युवकाचा मृतदेह झाडाला टांगलेला दिसून आला. या घटनेनंतर परिसरात चर्चेला उधाण आले. स्‍मशानाजवळील एका झाडाला युवकाचा मृतदेह लटकलेला दिसला.

Divya Marathi May 04, 2016, 17:30 IST
भरतपूर - भरतपुरच्‍या नदबई भागात बुधवारी सकाळी एका युवकाचा मृतदेह झाडाला टांगलेला दिसून आला. या घटनेनंतर परिसरात चर्चेला उधाण आले. स्‍मशानाजवळील एका झाडाला युवकाचा मृतदेह लटकलेला दिसला. ही आत्‍महत्‍या दिसत असली तरी, पोलिसांनी घातपाताचा संशय व्‍यक्‍त केला आहे. दिल्लीहून घरी आला होता युवक..    - नदबईच्‍या खटीक मोहल्ल्यात राहणारा विक्रम खटीक (25) या मृत युवकाचे नाव आहे. 
- पंजाबींच्‍या स्‍मशानाजवळ एका खुल्‍या प्‍लॉटमधील झाडाला लटकलेला मृतदेह दिसून आला. 
- हा मृतदेह ज्‍या अवस्‍थेत मिळाला त्‍यावरून असे दिसते की, हत्‍या करून प्रकरणाला आत्‍महत्‍येचे रूप देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. 
- पोलिसांच्‍या माहितीनुसार आधी या युवकाची हत्‍या केली. नंतर त्‍याला लटकवण्‍यात आले.
- या युवकाकडे मोबाइल, बटवा आणि रेल्‍वेचे तिकीट मिळाले. 
- युवकाकडे सापडलेल्‍या बटव्‍यात पैसे दिसले नाहीत. 
दिल्लीहून नुकताच आला होता गावात 
- विक्रम दिल्लीला नोकरी करत होता. तो नुकताच गावात आला होता.
- विक्रमच्‍या भावाला गावातील एका व्‍यक्‍तीचा फोन आला होता. तेव्‍हा त्‍याला ही घटना समजली. 
- विक्रमच्‍या भावाने सांगितले की, तो दिल्‍लीमध्‍ये कबाडीचे काम करत होता.    पुढील स्‍लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित फोटो..

Loading...

Recommended


Loading...