Loading...

शाळेत हिला म्‍हणत लठ्ठ, बॉडी बिल्डिंगसाठी सोडली नोकरी, पटकावले सुवर्ण पदक

जयपूर हे फिटनेस आणि बॉडी बिल्डिंगचे एक असे क्षेत्र राहिले जेथे पुरूषांचा दबदबा कायम राहिला. मात्र आम्‍हीही कोणत्‍या क्षेत्रात कमी नाही हे महिला सिद्ध करत आहेत. देशातील पहिली महिला बॉडी बिल्‍डर जयपूरची श्‍वेता राठोडने हे दाखवून दिले.

Divya Marathi Mar 19, 2016, 13:48 IST
जयपूर - जयपूर हे फिटनेस आणि बॉडी बिल्डिंगचे एक असे क्षेत्र राहिले जेथे पुरूषांचा दबदबा कायम राहिला. मात्र आम्‍हीही कोणत्‍या क्षेत्रात कमी नाही हे महिला सिद्ध करत आहेत. देशातील पहिली महिला बॉडी बिल्‍डर जयपूरची श्‍वेता राठोडने हे दाखवून दिले. जाणून घ्‍या चॅम्‍पियनशिपमध्‍ये कसे मिळवले सुवर्ण पदक..   - वेट लिफ्टिंग, पुल अप्स, पुश अप्स आणि मार्शल आर्ट्समध्‍ये श्वेताने मुंबईत आयोजित ‘मिस इंडिया स्पोर्ट्स फिजिक’ स्‍पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. - या स्‍पर्धेत कॉमप्लेक्शन, पॉइज आणि 90 सेकंदाच्‍या कामगिरीवर विजेते निवडले जातात;
- यापूर्वी श्वेताने 2014 मध्‍ये मिस वर्ल्ड फिटनेस फिजिकचा पुरस्‍कार पटकावला होता.
- त्‍यानंतर 2015 च्‍या आशियाई स्पर्धेत देशासाठी पहिले सिल्वर मेडल तिने पटकावले होते.   शाळेत सर्व म्‍हणत होते लठ्ठ..
-श्वेता सांगते की, शाळेत सर्वजण मला मोटी म्‍हणून हाक मारत होते.
- पण मी जास्‍त लठ्ठ नव्‍हती माझे स्ट्रक्चर थोडे वेगळे होते.
- त्‍यामुळे 11 वीत असताना मी वर्कआउट करणे सुरू केले.
- सुरूवातीच्‍या काळात मी जीममध्‍ये जाणे माझ्या वडिलांना आवडत नव्‍हते.
- मात्र, ट्यूशनच्‍या वेळेत मी जीममध्‍ये जात होती.
- हळूहळू मी बॉडी बिल्‍डिंगमध्‍ये पदार्पण केले.
- मुली मसल्‍स बनवल्‍यावर सुंदर दिसत नाहीत, हा गैरसमज मला सिद्ध करायचा होता.   वर्कआउटसाठी सोडली नोकरी..
- श्वेता म्‍हणते मी, इलेक्ट्रॉनिक्स अॅन्‍ड कम्यूनिकेशनमध्‍ये अभियांत्रिकीची पदवी मिळवली.
- पुढे एका कंपनीत मार्केटिंग हेड म्‍हणून 8 वर्ष मी नोकरीही केली.
- ती म्‍हणते, उन्‍हाळ्यात आमच्‍या परिवारातील लोक फिरायला जात. मी मात्र जीममध्‍ये असायची.   मुंबईमध्‍ये आहे NGO..
श्वेता मुंबईमध्‍ये एक एनजीओ चालवते. तिच्‍यासारखे स्‍वप्‍न बाळगणा-यांना तेथे प्रशिक्षण दिले जाते. श्वेता म्‍हणते महिलांनी त्‍याच्‍या स्‍वप्‍नांना कधी मर्यादा घालू नये. भारतात टॅलेंट आहे मात्र, योग्‍य दिशा मिळत नाही. महिला कुटुंबाला सांभाळत असताना आपल्‍या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात त्‍यामुळे महिलांमध्‍ये वाढणा-या आजाराचे प्रमाण अधिक आहे.   पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, श्वेताचे काही खास PHOTOS...

Loading...

Recommended


Loading...