Loading...

VIDEO : ओसामा बिन लादेनचे आधार कार्ड बनवल्याप्रकरणी सद्दाम हुसेनला अटक

भारतात बनावट मतदार कार्ड, पॅन कार्ड बनवण्याच्या घटना रोज उघडकीस येत असतात. पण राजस्थानमधील सद्दाम हुसेन नामक युवकाने चक्क अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या नावानेच आधार कार्डसाठी अर्ज केला आहे.

Divya Marathi May 17, 2017, 15:09 IST
जयपूर - भारतात बनावट मतदार कार्ड, पॅन कार्ड बनवण्याच्या घटना रोज उघडकीस येत असतात. पण राजस्थानमधील सद्दाम हुसेन नामक युवकाने चक्क अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या नावानेच आधार कार्डसाठी अर्ज केला आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा खोडसाळपणा उघडकीस आला आहे. सद्दाम हुसेन मन्सुरी नामक २५ वर्षीय युवकाला राजस्थानच्या भिलवाडा पोलिसांनी अटक केली आहे.   भिलवाड्याचे पोलिस अधीक्षक प्रदीप मोहन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्दाम हुसेन हा भिलवाडा जिल्ह्यातील मांडल या गावचा रहिवासी असून तो कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. मागील काही वर्षांपासून तो या भागात आधार कार्ड नोंदणी केंद्र चालवतो. दरम्यान, सर्व यंत्रणा स्वत:च्याच हातात असल्याचे त्याला वाटू लागले. याचमुळे त्याने अमेरिकेतील ९/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या नावानेच आधार कार्ड बनवण्याची योजना आखली.    त्यानुसार त्याने आधार कार्ड नोंदणी संकेतस्थळावर अर्जही केला. त्या अर्जासोबत एक छायाचित्रही अपलोड केले. शिवाय लादेनच्या पाकिस्तानातील वास्तव्याचा पत्ता असलेल्या अबोटाबादचा पत्ताही अर्जात नमूद करून टाकला होता. 
अधिकाऱ्याच्या सतर्कतेने अडकला 
सद्दामने केलेला अर्ज प्राप्त झाल्यानंतर मंडळ अधिकारी चंचल मिश्रा यांना त्यात त्रुटी आढळून आली. कारण सद्दामने अर्जासोबत दिलेले छायाचित्र काहीसे अंधुक आणि अस्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे मिश्रा यांनी लगेच संपूर्ण अर्जाची पुनर्पडताळणी करून पाहिली. त्यात हा खोडसाळपणा बाहेर आला. दरम्यान, त्यांनी मांडल पोलिसांत याची तक्रारही दाखल केली.   ‘तो मी नव्हेच’चा पवित्रा  
सद्दामला माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार अटक केली आहे. पोलिसांनी दस्तऐवज माहिती तंत्रज्ञान विभागाला दिले आहेत. आपण असे कृत्य केले नसून निर्दोष असल्याचा कांगावा सद्दामने केला आहे. मात्र, त्याचा लॉगिन आयडी व हाताचा ठसा असल्याशिवाय अर्जच पुढे जाऊ शकत नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.   पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हि़डिओ...

Loading...

Recommended


Loading...