Loading...

मुलाच्‍या लग्‍नाच्‍या एक दिवस आधी लुटले घर, 15 दिवसानंतर मुलगीही बनणार वधू

घरात लग्‍नसोहळा असल्‍याने सर्वत्र आनंदीआनंद होता. 29 जानेवारीला मुलाचे लग्‍न नि त्‍याच्‍या 14 दिवसानंतर 12 फेब्रुवारीला मुलीचे लग्‍न होते. मात्र, चोरट्यांनी घरावर दरोडा टाकून विघ्‍न आणले. आनंदाच्‍या वातावरणात स्‍मशान शांतता पसरवणा-या या घटनेत चोरट्यांनी 50 तोळे सोने, 34 किलो चांदी, 3 प्लॉटचे कागदपत्र आणि 3.5 लाख रूपये कॅश एवढा मुद्देमाल पळवला आहे. दरोडा पडला तेव्‍हा कुटुंबिय सत्‍सं�

Divya Marathi Jan 29, 2016, 12:41 IST
जोधपूर- घरात लग्‍नसोहळा असल्‍याने सर्वत्र आनंदीआनंद होता. 29 जानेवारीला मुलाचे लग्‍न नि त्‍याच्‍या 14 दिवसानंतर 12 फेब्रुवारीला मुलीचे लग्‍न होते.  मात्र, चोरट्यांनी घरावर दरोडा टाकून विघ्‍न आणले. आनंदाच्‍या वातावरणात स्‍मशान शांतता पसरवणा-या या घटनेत चोरट्यांनी 50 तोळे सोने, 34 किलो चांदी, 3 प्लॉटचे कागदपत्र आणि 3.5 लाख रूपये कॅश एवढा मुद्देमाल पळवला आहे.  दरोडा पडला तेव्‍हा कुटुंबिय सत्‍संगात होते.   फतेहपोल गहलोतोंमध्‍ये राहणारे राजेंद्र मल्होत्रा यांच्‍या घरी हा दरोडा पडला आहे.  पोलिसांनी घटनास्‍थळावरून फिंगर प्रिंट घेतले आहेत. घरात आनंदाचे वातावरण होते. त्‍यात अशी घटना घडल्‍याने परिवार चिंतेत बुडाला. मल्‍होत्रा परिवाराने दोन्‍ही लग्‍नासाठी दागिन्‍यांची खरेदी केली होती. मात्र चोरट्यांनी ही संधी साधत दागिने व पैसे पळवले आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.   पोलिसांचा संशय...
घरातीलच कोण्‍या व्‍यक्‍तीचा या घटनेत हात असू शकतो असा संशय व्‍यक्‍त केला जात आहे.  कारण चोरांनी घरात ठेवलेल्‍या कोणत्‍याही वस्‍तूंना हात लावला नाही. चावीने कपाट उघडून मुद्देमाल पळवण्‍यात आला व चावी होती त्‍या ठिकाणीच ठेवण्‍यात आली. यावरून घरातील व्‍यक्‍तीचा या घटनेत हात असू शकतो असा संशय व्‍यक्‍त केला जात आहे.   पैशांची गरज भासली तेव्‍हा चोरी लक्षात आली: राजेंद्र मल्होत्रा यांनी सांगितले की, मुलगा पीयूष आणि मुलगी शालिनी यांचे लग्‍न असल्‍याने 27 जानेवारीला सायंकाळी सत्संगाचे आयोजन केले होते. दरम्‍यान पैशांची गरज भासली. तेव्‍हा घरात शिरताच  हा प्रकार लक्षात आला.   पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, घटनास्‍थळावरील फोटो...

Loading...

Recommended


Loading...