Loading...

चोरट्यांचा अड्डा: येथे जायला पोलिसही घाबरतात, 10 लाखांची Suv मिळाली केवळ 1 लाखात

राजस्‍थानमधील भरतपूर हे चोरट्यांच्‍या अड्ड्यासाठी कुप्रसिद्ध आहे. येथे चोरट्यांची एवढी दहशत आहे की, पोलिसही येथे कारवाई करण्‍यास घाबरतात. येथील कार चोरट्यांच्‍या नेटवर्कचा खुलासा करण्‍यासाठी भास्‍करचे दोन रिपोर्टर येथे दहा दिवस राहिले.

Divya Marathi Mar 15, 2016, 19:24 IST
आरोपी सुरेश गुर्जर आणि जय ज्‍यांनी दुचाकींची विक्री केली.
जयपूर - राजस्‍थानमधील भरतपूर  हे चोरट्यांच्‍या अड्ड्यासाठी कुप्रसिद्ध आहे. येथे चोरट्यांची एवढी दहशत आहे की, पोलिसही येथे कारवाई करण्‍यास घाबरतात. येथील कार चोरट्यांच्‍या नेटवर्कचा खुलासा करण्‍यासाठी भास्‍करचे दोन रिपोर्टर येथे दहा दिवस राहिले. जाणून घ्‍या, चोरी, सौदा व कसे तयार करतात कागदपत्रे..   - या चोरगढीमध्‍ये दररोज सुमारे 100 वाहनांची विक्री होते. - दुचाकींपासून लग्‍झरी वाहने येथे मिळतात.
- उत्तरप्रदेश, हरयाणा, दिल्ली-पंजाब येथून चोरी झालेल्‍या वाहनांचा येथे बाजार भरतो.
- चोरट्यांनी शेतांमध्‍ये अंडरग्राउंड गोदाम केले आहेत. त्‍यावर गवताचे छप्‍पर बनवलेले दिसते.
- या परिसरात चालणारी 30 % वाहने ही बाहेरच्‍या क्रमांकाचे आहेत.   प्रश्‍न : पोलिस काय करतात?
पोलिसही या गावात कारवाईसाठी जात नाहीत. एकदा येथे पोलिसांनी कारवाई केली होती तेव्‍हा दीड हजार जवानांची अतिरिक्‍त फोर्स पोलिसांनी सोबत आणली होती.
कसा झाला खुलासा..
- भास्करच्‍या रिपोर्टरने बनावट ग्राहक बणून चोरांसोबत तीन सौदे केले. - चोरांकडून वाहनं खरेदी करून पोलिसांना दिली.
- स्टिंगपूर्वी  भरतपूरचे पोलिस महानिरीक्षक आलोक वशिष्ठ यांना माहिती देण्‍यात आली.
- गेल्‍या वर्षभरात राजस्‍थानमधून सुमारे 20 हजार वाहनांची चोरी झाली आहे.
- चोरगढी येथे केवळ चोरीच्‍या गाड्याच मिळत नाहीत, तर खोटी कागदपत्रही तयार होतात.
- येथे चोरट्यांच्‍या दोन टोळ्या सक्रीय आहेत.
- एक टोळी रस्‍त्‍यावरील वाहनांची चोरी करते, दुसरी वाहनांची खोटी कागदपत्रे तयार करते.
- रिपोर्टर्सनी चोरट्यांकडून दुचाकी खरेदी करण्‍याचा पहिला सौदा पाच हजार रूपयांमध्‍ये केला.
- एके दिवशी पुन्‍हा एक दुचाकी खरेदी केली. या गाड्यांची डिलीव्‍हरीही तत्‍काळ झाली.
- रिपोर्टर्स सांगतात, तासभरात हवे ते मॉडेल, हव्‍या त्‍या रंगाची गाडी आमच्‍यापर्यंत पोहोचली.
- चोरांना स्कॉर्पियो मागितली तर ती पण उपलब्‍ध होती. दहा लाखांच्‍या मॉडेलचा सौदा एक लाख रूपयात झाला होता.   पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कसे झाले 3 सौदे, 1 लाख रूपयात कागदपत्रांसह मिळाली स्कॉर्पियो..  

Loading...

Recommended


Loading...