Loading...

या हॉटेलमध्ये रात्री सिगारेट ओढली तर भूत मरतो चापट, वाचा रहस्‍य

राजस्थानमध्‍ये पर्यटनाला गेल्‍यावर तेथील हेरिटेज हॉटेलमध्‍ये थांबणे प्रत्‍येकाला पसंत असते. कोटाच्‍या एका पॅलेस हॉटेलमध्‍ये रात्री लोकांना रॉयल फीलिंग महागात पडते. कुणी जर रात्री या हॉटेलमध्‍ये सिगारेट पेटवत असेल, तर त्‍याला जोरदार चपराक मिळते.

Divya Marathi Jun 09, 2016, 13:44 IST
जयपूर- राजस्थानमध्‍ये पर्यटनाला गेल्‍यावर तेथील हेरिटेज हॉटेलमध्‍ये थांबणे प्रत्‍येकाला पसंत असते. कोटाच्‍या एका पॅलेस हॉटेलमध्‍ये रात्री लोकांना रॉयल फीलिंग महागात पडते. कुणी जर रात्री या हॉटेलमध्‍ये सिगारेट पेटवत असेल, तर त्‍याला जोरदार चपराक मिळते. विशेष म्हणजे ही चपराक लगावणारी व्‍यक्‍ती कोण आहे हे दिसत नाही. ही बाब अजुनही एक रहस्‍यच आहे. लोकांचा असा समज आहे की, येथे एका ब्रिटीश मेजर आणि त्‍याच्‍या मुलाची आत्‍मा फिरत राहते..
रात्री ड्युटीवर झोप आली तर होते पिटाई..
- कोटाच्‍या सिव्‍हिल लाईन्‍स, नयापुरामधील बृजराज भवन पॅलेस पर्यटकांमध्‍ये प्रसिद्ध आहे.
- या हॉटेलमध्‍ये पर्यटकांना आवर्जून थांबावे वाटते. -  येथे थांबण्‍याआधी पर्यटकांना सूचना दिली जाते की, येथे रात्री सिगारेट पिण्‍यावर बंदी आहे.
- पर्यटक ही बाब ऐकूण चकीत होतात.
- असे म्‍हटले जाते की, येथे एका मेजरचा भूत फिरत असतो आणि तो शिस्‍तप्रिय आहे.
- रात्री सिगारेट पिणे किंवा ड्यूटीवर असताना झोपणे त्‍याला पसंत नाही.
- असे करणा-या हा भूत बदडतो असे सांगितल्‍या जाते.
- कुणी गार्ड जर रात्री झोपत असेल तर, त्‍याला किंचाळण्‍याचा आवाज येतो.
- दुस-या दिवशी सकाळी त्‍याचा गाल लाल झालेला आणि सुजलेला दिसतो.
- ही शिक्षा हॉटेलचे मॅनेजमेंट नाही तर, हॉटेलमधील भूत देतो.
- रात्री या पॅलेसच्‍या बागेत कुणी जात नाही. काही लोकांनी दावा केला की, आम्‍ही या बागेत मेजर आणि त्‍याच्‍या मुलाला फिरताना पाहिले आहे.   पुढील स्‍लाइड्सवर वाचा, या हॉटेलच्‍या निर्मितीबाबत या खास बाबी..

Loading...

Recommended


Loading...