Loading...

पाशवी वृत्ती आजन्म गजाआड; बलात्कार प्रकरणी आसारामला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा

आसारामसह पाचही आरोपी लैंगिक शोषण आरोपात दोषी ठरले आहे. जज मधुसूदन शर्मा यांनी जोधपूर तुरुंगात हा निर्णय दिला आहे.

Divya Marathi Apr 26, 2018, 08:04 IST
अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

जोधपूर - २०१३ मध्ये १५ ऑगस्टच्या रात्री १६ वर्षीय मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्याचा दोषी ८० वर्षीय आसारामला जोधपूर कोर्टाने आजन्म कैदेची शिक्षा ठोठावली. कैदी नं. १३० म्हणून आसारामला उर्वरित आयुष्य आता कोठडीतच कंठावे लागेल. एससी-एसटी कोर्टाचे जज मधुसूदन शर्मा यांनी बुधवारी हा निकाल सुनावला.

 

प्रकरणात सहआरोपी आसारामच्या छिंदवाडा गुरुकुलची  वाॅर्डन शिल्पी व संचालक शरतचंद्रला २०-२० वर्षांची शिक्षा झाली. सेवक शिवा व स्वयंपाकी प्रकाश पुराव्यांअभावी निर्दोष सुटले. सुनावणीसाठी जोधपूर तुरुंगातच कोर्ट बसले होते. वृद्धापकाळामुळे कमी शिक्षा देण्याची मागणी मागणी आसारामच्या वकिलांनी केली.  त्यावर जज म्हणाले, ‘हा घृणास्पद गुन्हा पीडितच  नव्हे तर संपूर्ण समाजाविरुद्ध आहे. दोषीला मृत्यू होईपर्यंत तुरुंगातच राहावे लागेल’. 

 

आसारामला ६ कलमान्वये शिक्षा, दाेन कलमान्वये अाजन्म तुरुंगवास

1) कलम ३७० (४)- अल्पवयीनची तस्करी
लैंगिक अत्याचारासाठी मुलीस छिंदवाडाच्या अाधी दिल्ली व नंतर जोधपूरमध्ये नेले हाेते.
शिक्षा : दहा वर्षापर्यंत सक्तमजुरी अाणि एक लाख रुपयांचा दंड.

 

2) कलम ३४२ - डांबून ठेवले
आसारामने लैंगिक अत्याचार करण्यासाठी मुलीस दीड तासापर्यंत डांबून ठेवले. 
शिक्षा: एक वर्षापर्यंत सक्तमजुरीची शिक्षा अाणि एक हजार रुपये दंड.

 

3) कलम ३७६ (२) एफ- पदाचा दुरुपयोग
आसाराम धार्मिक संस्थांचा विश्वस्त अाहे. पीडितेची त्याच्यावर श्रद्धा असूनही अत्याचार केला.
शिक्षा : अाजन्म कठोर कारावास. एक लाख रुपयांचा दंडही.

 

4) कलम ३७६ (डी)- संघटित अत्याचार
आसाराम, शिल्पी व शरतचंद्र यांनी मिळून संबंधित मुलीवर अत्याचार करण्याचा कट रचला.
शिक्षा : अाजन्म कठोर कारावास. एक लाख रुपयांचा दंडही.

 

कोर्टाने निकालात म्हटले...दोषीला योग्य शिक्षा न दिल्यास न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
आसारामने पीडितेचा विश्वासघात केला.सामान्य लोकांत असणारी संताची प्रतिमाही खराब केली. त्याचा गुन्हा समाजाविरुद्ध आहे. योग्य शिक्षा न दिल्यास न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहतील.
- मधुसूदन शर्मा, जज, विशेष एससी-एसटी कोर्ट 

 

निकालावर आसाराम म्हणाला, मी तर तुरुंगातही मजा करणार, बोला, हरिओम... हरिओम...
 सकाळी १०.३० वाजता दोषी ठरवल्यावर आसाराम जोरात हसला. नंतर डोकं धरून बसला व हरिओमचा जप करू लागला. अडीच वाजता शिक्षा सुनावल्यावर ढसा-ढसा रडू लागला. पोलिस नेत असताना म्हणाला, "मी तर तुरुंगातही मजा करणार'

 

पीडितेचे वडील म्हणाले...मुलीला न्याय मिळवून देऊ शकलो, याचा अभिमान राहील
पीडितेचे वडील म्हणाले, ४ वर्षांपासून या क्षणाची प्रतीक्षा होती. आज माझ्या मुलीला न्याय मिळाला. मला भरपाई नको.कायम धोका राहील. मात्र आता मरणाची भीती नाही. मेलो तरी लेकीला न्याय मिळवून दिल्यानंतरच मेलो, याचा अभिमान असता.’

 

ईश्वराशिवाय मनुष्याने जर इतरत्र मन रमवले तर शेवटी रडावेच लागेल

- आसारामचे २२ जून २०१३ रोजी अहमदाबादेत वक्तव्य

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, शिल्पी व शरतचंद्र यांना २०-२० वर्षे शिक्षा... 

 

हेही वाचा, 
समेटासाठी धमकी, लाचही देऊ केली, 4 साक्षीदार मारले गेले; तरीही पीडित कुटुंबाचे खचले नाही धैर्य

- आस्थेच्या शोषणाचे बीभत्स नृत्य समाप्त (भास्कर संपादकीय)

- आसारामला जन्मठेप, इतर दोघांना 20-20 वर्षांची कैद; वाचा- खटल्याचा A To Z घटनाक्रम

 


Loading...

Recommended


Loading...